Corona Lockdown : ST महामंडळातील ‘तो’ कंडक्टर चक्क ‘मिल्खा’ बनून धावला 21 KM, डयुटीवर वेळेत पोहचला

मुंबई , पोलिसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळात कार्यरत असणाऱ्या देविदास राठोड यांनी ड्युटीवर येण्यासाठी चक्क २१ किलोमीटरची पायपीट केली. आणि हा सगळं खटाटोप करण्यामागचे कारण म्हणजे देविदास यांना कोरोना अत्यावश्यक सेवा पुरवण्याची जवाबदारी देण्यात आली आहे. देविदास यांच्यावर मुंबईतील केईम रुग्णालयातील २५ डॉक्टर्स आणि नर्स यांना हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्याची जवाबदारी सोपवण्यात आली आहे. मुबंई पासून १०० किलोमोटार लांब असणाऱ्या मनोर गावत देविदास कुटुंबासमवेत राहतात. त्यामुळे ड्युटीवर येण्यासाठी देविदास यांना रोज २१ किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. जर कोणी लिफ्ट दिली तर त्यांची पायपीट कमी होते. अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या देविदास यांच्याकडील पास पाहून त्यांना कधी कधी लिफ्ट देत असत, परंतु रविवार असल्या कारणाने अनेक ट्रक चालकांना सुट्टी होती त्यामुळे देविदास यांना काही लिफ्ट मिळाली नाही , तरीसुद्धा हतबल न होता देविदास हे धावत धावत २१ किलोमीटरचे अंतर कापत कापत ड्युटीवर पोहचले . त्यांच्या या कृत्यांचे देशभरात कौतुक होत आहे. त्यांच्या कर्तव्याप्रती असणारी जाणीव बरेच काही शिकवून जात आहे. देविदास हे पालघर येथून सेंट्रल मुंबई डेपोमध्ये कार्यरत आहेत. देविदास हे रोज घरून निघताना स्वतःसोबत पाण्याच्या बाटल्या ठेवतात आणि पालघरपर्यंत पायपीट करतात. सकाळी ६ वाजता देविदास यांना ड्युटीवर पोहचावे लागते तिथून ३ वाजता त्यांची सुट्टी होते . तेथून ते दादरला बसमधून जातात. ५ वाजता दादरला पोहचल्यावर देविदास यांची २१ किलोमीटरची पायपीट सुरु होते.

देविदास राठोड म्हणाले माझ्यावर अत्यावश्यक सेवांमधील डॉक्टर्स आणि नर्स यांना पोहचवण्याची मोठी जवाबदारी आहे त्यामुळेच मी या कर्तव्यपायी अतिशय तत्पर आहे . राठोड यांना धावण्याची आवड आहे तसेच रोज सकाळी उठल्यावर ते धावायला सुद्धा जातात. देविदास यांच्या या कामगिरीबद्दल एसटी महामंडळात त्यांचा छोटेखानी सत्कार देखील करण्यात आला. देविदास यांना ४ मुले आहेत त्यांची १ मुलगी वैद्यकीय शिक्षण घेतीये तर १ मुलगी नर्स आहे आणि मुलगा सिक्युरिटी गार्ड असून दुसऱ्या मुलाने प्रिंटिंगचे शिक्षण घेतले आहे.