Coronavirus Impact : ‘सेक्स’ लाईफ खराब करणार ‘कोरोना’ ! ‘कोरोना’मुक्त 81 रुग्णांच्या तपासणीत आलं समोर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूमुळे केवळ या पिढीतील लोक त्रस्त नाहीत तर पुढील पिढीलाही या विषाणूचा धोका आहे. कारण हा विषाणू पुरुषांच्या सेक्स हार्मोन्सवर परिणाम करतो. म्हणजेच पुरुष नपुंसक बनतात. यामुळे पुरुषांचे अंडकोष खराब होत आहेत. तसेच, त्यांच्यातील उत्तेजना देखील कमी होऊ शकते. चीनच्या वुहानच्या युनिव्हर्सिटीने हा खुलासा केला आहे.

वुहान विद्यापीठाच्या झॉन्गनान रुग्णालयामध्ये हे अध्ययन करण्यात आले असून झॉन्गनान रुग्णालयाने कोरोना विषाणूने बाधित असलेल्या ८१ पुरुषांवर हे अध्ययन केले आहे. या ८१ पुरुषांचा वयोगट २० ते ५४ वर्षे आहे. या अध्ययनात झॉन्गनान रुग्णालयाच्या मदतीसाठी हुबेई क्लिनिकल रिसर्च सेंटर फॉर प्रीनेटर डायग्नोसिस अँड बर्थ हेल्थच्या वैज्ञानिकांनी देखील मदत केली आहे.

या सर्व रूग्णांना जानेवारीत वुहानमधील झॉन्गनान रुग्णालयात दाखल केले होते. या सर्व रूग्णांच्या सेक्स हार्मोन्सची तपासणी तेव्हा केली गेली जेव्हा ते ठीक होणार होते. कारण पुरुषांच्या हार्मोन्सवर काय परिणाम झाला ते नंतरच दिसून येईल. झॉन्गनान रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या टीमला आढळून आलं की या रुग्णांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन आणि ल्यूटीनायझिंग हार्मोनचं प्रमाण बिघडत आहे. त्याला टी/एलएच प्रमाण म्हटले जाते.

जर टी/एलएच अनुपात बिघडला तर पुरुषांचे अंडकोष व्यवस्थित कार्य करत नाहीत. त्यांच्यात वीर्य बनणे कमी होते किंवा थांबते. तसेच, सेक्स हार्मोन्सची कमतरता देखील येते. अध्ययन करण्यात आलेल्या पुरुषांमध्ये टी/एलएच प्रमाण ०.७४ होता. म्हणजेच, सामान्य पातळीच्या अर्ध्यापेक्षा कमी होते, हे अत्यंत चिंताजनक आहे आणि यामुळे पुढची पिढी धोक्यात येईल.

टेस्टोस्टेरॉन हार्मोन हा पुरुषांचा मुख्य हार्मोन आहे जो अंडकोष, स्नायू, हाडे आणि केस बनविण्यात मदत करतो. ल्यूटीनायझिंग हार्मोन पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये असतात. यामुळे पुरुष आणि स्त्रिया उत्तेजित होतात. कोरोना विषाणूमुळे पुरुषांमधील उत्तेजना कमी (इरेक्टाइल डिसफंक्शन) होत आहे. यामुळे पुरुषांमधील सेक्स करण्याची क्षमता कमी होत आहे.

उत्तेजनाच्या कमीला ठीक केले जाऊ शकते, परंतु ते थोडेफार कमी असेल तेव्हा. चीनमध्ये तर कोरोनामुळे पीडित पुरुषांचे टी/एलएच प्रमाण ०.७४ होते. हार्मोन्सचा एक इलाज आहे, परंतु हा इलाज तेव्हा होतो जेव्हा टी/एलएच प्रमाण ०.८७ पेक्षा जास्त असेल.

वुहानच्या टोंगजी हॉस्पिटलच्या प्रजनन औषध विभागाचे प्रोफेसर ली यूफेंग म्हणाले की कोरोना विषाणू पुरुषांच्या अंडकोषांवर हल्ला करू शकतो आणि त्यांना निष्क्रिय करू शकतो याचा त्यांनी खूप पूर्वी अभ्यास केला होता. तथापि, हे अध्ययन अद्याप अगदी लहान समूहावर करण्यात आला होता. आता झॉन्गनान रूग्णालयाच्या शास्त्रज्ञांनी याचा मोठ्या प्रमाणावर अध्ययन करायचे ठरवले आहे, जेणेकरून अधिक स्पष्ट डेटा आणि परिणाम समोर येतील.

You might also like