Coronavirus in Maharashtra | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत महाराष्ट्रात ‘एवढ्या’ लाख जणांना होऊ शकते बाधा, मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणेंनी दिली माहिती

मुंबई (Mumbai News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama news) – Coronavirus in Maharashtra |राज्यात कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट आटोक्यात येत असतानाच तिस-या लाटेचा धोका कायम आहे. या संभाव्य तिसऱ्या लाटेत राज्यातील 50 लाख नागरिकांना संक्रमण होईल. यात 5 लाख लहान मुले असतील, असा धोक्याचा इशारा राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे ( Food and Drug Administration Minister Dr. Rajendra Shingane) यांनी दिला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

मंत्री राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) यांनी बुलढाण्यात (Buldhana) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कोरोना संकट आणि तिसऱ्या लाटे (Third Wave) बाबत भाष्य केलं. तिसरी लाट टोक गाठेल, त्यावेळी अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 8 लाखांच्या घरात असेल. जवळपास 5 लाख मुलांना कोरोनाची लागण होईल. यापैकी 2.5 लाख मुलांना रुग्णालयात दाखल करावे लागेल, असे ते म्हणाले. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार आणि प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

आरोग्यविषयक सेवा सुविधा ( Health Care Facility) वाढवणे, औषधांचा साठा करणे, आरोग्य कर्मचारी (Health Staff) यांना सज्ज ठेवण्याचे काम सुरु आहे. तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना असलेला धोका पाहता बालरोगतज्ज्ञांची फळीदेखील सज्ज ठेवली जाणार असल्याचे शिंगणे म्हणाले. दरम्यान कोरोनाच्या पॉझिटिव्हिटी रेटनुसार निश्चित केलेले 1 आणि 2 स्तर रद्द करून आता केवळ तीन, चार आणि पाच असे तीनच स्तर ठेवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे 33 जिल्ह्यांमध्ये स्तर तीनचे निर्बंध लागू झाले आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : coronaviurs in maharashtra 50 lakh people could be infected third wave covid state says minister dr rajendra shingne

हे देखील वाचा

Hot Yoga Teacher | अभिनेत्रींपेक्षाही हॉट योगा टीचर ! काम करून महिन्याला कमवते ‘एवढे’ लाख रूपये, तुम्ही विचार देखील नाही करू शकत

Pimpri News | ‘मी तुझ्यासाठी झुरतोय’ म्हणत दीड वर्ष केला तरूणीचा पाठलाग; मजनू बनलेल्या तरूणाला अखेर…

Secret Affair | आरोग्यमंत्र्याचं महिला सहकार्‍यासोबत ‘लफडं’? ऑफिसच्या बाहेरच ‘चुंबन’ घेताना झाले CCTV मध्ये कैद