Coronavirus in Maharashtra : राज्यातील कोरोनाची धक्कादायक आकडेवारी ! गेल्या 24 तासात 8807 नवे पॉझिटिव्ह तर 80 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसचा उद्रेक पहायला मिळत आहे. त्यानंतर आता राज्यातील कोरोनाची परिस्थिती भीषण झाल्याचे धक्कादायक आकडेवारीत समोर आले आहे. आत्तापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 हजारांपर्यंत होती. मात्र, आता हा आकडा 8 हजार पार गेला आहे.

महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज 8807 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली व आज 2772 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत एकूण 20,08,623 रुग्ण बरे झाले असून, त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. सध्या राज्यात एकूण 59,358 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.70% झाले आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र, त्यामध्ये शिथिलता आणल्यानंतर रुग्णसंख्या वाढत आहे. त्यानुसार, सध्या पुणे, मुंबई, अमरावती, नागपूर, नाशिक आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहिला मिळत आहे. मात्र, राज्यातील कोरोना व्हायरसचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहे.