Coronavirus In India : 24 तासात देशात ‘कोरोना’ची 50 हजारपेक्षा जास्त नवी प्रकरणे,बाधितांचा आकडा 75 लाखांच्या पुढं

नवी दिल्ली : भारतात सोमवारी कोरोना व्हायरस संसर्गाची 50 हजारपेक्षा जास्त प्रकरणे समोर आली. तर 500 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. या कालावधीत 60 हजारपेक्षा जास्त लोक बरे झाले. सध्या देशात 7,72,055 केस अ‍ॅक्टिव्ह आहेत, तर 66,63,608 लोक बरे झाले आहेत. तसेच एकुण 1,14,610 लोकांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यांनुसार, देशात सध्या 10.45 टक्के केस अ‍ॅक्टिव्ह आहेत, तर 88.03 टक्के लोक बरे झाले आहेत. तसेच 1.52 टक्के लोकांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. मंत्रालयाने म्हटले की, ते त्यांच्या आकड्यांची पडताळणी आयसीएमआरसोबत करत आहेत.

एक दिवसात 55,722 नवी प्रकरणे
तर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) सांगितले की, 18 ऑक्टोबरपर्यंत एकुण 9,50,83,976 सॅम्पल्सची टेस्टींग करण्यात आली, यापैकी 8,59,786 सॅम्पल्सचे रविवारी परीक्षण करण्यात आले. रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून सोमवारी सकाळी आठ वाजेदरम्यान 579 लोकांचा मृत्यू झाला, तर 66,399 लोक बरे झाले आहेत, तसेच अ‍ॅक्टिव्ह केसेसच्या संख्येत 11,256 ची घसरण नोंदली गेली आहे. एका दिवसात 55,722 नवीन प्रकरणे आढळली. देशात कोरोनाची सध्या 75,50,273 अ‍ॅक्टिव्ह प्रकरणे आहेत.

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची 9,060 नवी प्रकरणे
महाराष्ट्रात रविवारी कोरोना व्हायरस संसर्गाची 9,060 नवी प्रकरणे समोर आल्यानंतर राज्यात संक्रमितांची एकुण संख्या 15,95,381 झाली आहे. आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आरोग्य विभागाने म्हटले आहे की, महामारीमुळे आणखी 150 रूग्णांचा मृत्यू झाल्याने एकुण मृतांची सख्या वाढून 42,115 वर पोहचली आहे. दिवसभरात आणखी 11,204 लोकांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यात बरे होणार्‍या लोकांची एकुण संख्या 13,69,810 झाली आहे.