Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 9060 नवीन रुग्ण तर 150 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात दररोज कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या 24 तासात राज्यात 11 हजार 204 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.86 टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्याची संख्या 13 लाख 69 हजार 810 इतकी झाली असून राज्यातील उपचार सुरु असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. राज्यात 1 लाख 82 हजार 973 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

राज्यात गेल्या 24 तासात 9 हजार 060 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या सोळा लाखाच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 15 लाख 95 हजार 381 इतकी झाली असून राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 19.6 टक्के इतके आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण घटले असताना मृत्यूचे प्रमाण देखील काही प्रमाणात कमी झाले आहे.

राज्यात गेल्या 24 तासात 150 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 42 हजार 115 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 2.64 टक्के इतके असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. आजपर्यंत 81 लाख 39 हजार 466 नमुन्यांपैकी 15 लाख 95 हजार 381 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 24 लाख 12 हजार 921 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 23 हजार 384 लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.