Corporator Archana Patil | रुग्णालयांकडून दरपत्रक दर्शनी भागात लावण्यास उदासीनता, नगरसेविका अर्चना पाटील यांनी केली ‘ही’ मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Corporator Archana Patil | महाराष्ट्र शासनाच्या (Maharashtra Government) आदेशानुसार शहरातील सर्व खासगी रुग्णालयांनी नागरिकांच्या सोईसाठी दर्शनी भागात तेथे मिळणाऱ्या सुविधांचे दरपत्रक (rates of private hospital) लावावेत असे आदेश पुणे (Pune News) महापालिकेने दिले आहेत. मात्र पुणे शहरातील अनेक रुग्णालयांनी उपचार दरपत्र दर्शनी भागात लावले नाहीत. त्यामुळे नगरसेविका अर्चना पाटील (Corporator Archana Patil) यांनी आरोग्य विभागातील (Health Department) अधिकाऱ्यांवर याबाबत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी नगरसचिवांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना (Corona) विषाणूच्या प्रादुर्भावाने कहर माजला होता. या आपात्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र शासन, राज्य शासन तसेच महापालिका स्तरावर मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या.
याच अनुषंगाने नागरिक आणि रुग्णालये यांच्यमध्ये पारदर्शकता येण्याचे दृष्टीने सर्व रुग्णांना उपचार दरपत्रक दर्शनी भागात लावण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
परंतु अनेक रुग्णालयांनी उपचार दरपत्रक दर्शनी भागामध्ये लावले नसल्याचे निदर्शनास येत आहे.
याबाबत महानगरपालिकेच्या (Municipal Corporation) आरोग्य विभागाकडील अधिकाऱ्यांवर योग्य जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी अर्चना पाटील (Corporator Archana Patil) यांनी केली आहे.

रुग्णालयांना ही माहिती लावावी लागणार

रुग्णालयाचे प्रवेश शुल्क, प्रतिदिन आंतररुग्ण दर, वैद्य शुल्क, सहायक वैद्य शुल्क, भूल शुल्क, शस्त्रक्रिया शुल्क, शस्त्रक्रिया सहायक शुल्क, भूल सहायक शुल्क, शुश्रुषा शुल्क,
सलाईन व रक्त संक्रमण शुल्क, विशेष भेट शुल्क, मल्टिपॅरा मॉनिटर शुल्क, पॅथॉलॉजी शुल्क, ऑक्सिजन शुल्क, रेडिओलॉजी व सोनोग्राफी शुल्क,
याशिवाय अधिकच्या उपचार सुविधा उपलब्ध असल्यास त्याचे ही दर या बोर्डावर लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

Web Title : Corporator Archana Patil | Corporator Archana Patil demands towards hospitals to show ratecard in front area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Black death | पुन्हा पसरू शकते ’ब्लॅक डेथ’ नावाची महामारी, रशियन डॉक्टरने दिला इशारा

Sameer Wankhede Spying Case | समीर वानखेडे हेरगिरी प्रकरण ! मुंबई पोलीस आयुक्तांनी उचललं ‘हे’ पाऊल

Elle Macleman | ‘या’ पध्दतीनं कधीही घालू नका Underwear, भयंकर इन्फेक्शनचा वाढू शकतो धोका; जाणून घ्या बचावाची पद्धत