Corporator Archana Patil | आईवडील गमवलेल्या बालकांचे होणार सर्वेक्षण ! नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांच्या मागणीला मुख्य सभेची मान्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Corporator Archana Patil | कोरोनाच्या संसर्गामुळे ज्या याकरिता कृती गट तयार केला आहे. मुलांना आईवडील गमवावे लागले यासाठी बालकांचे सर्वेक्षण सुरू करावे अशी मागणी नगरसेविका अर्चना तुषार पाटील (Corporator Archana Patil ) यांनी मुख्यसभेकडे केली होती.या प्रस्तावाला आज पुणेमहापालिकेच्या (Pune Corporation) मुख्य सभेची मजुरी (PMC GB Meeting) मिळाली.

कोरोनामुळे दोन्ही पालक गमविलेल्या बालकांच्या सर्वेक्षणासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हास्तरीय टास्क फोर्स कार्यन्वित करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने दोन्ही पालक गमविलेल्या बालकांच्या घरी प्रशासनामार्फत घरटी सर्वेक्षण कार्यवाही सध्या सुरू आहेत. त्या बालकांना भवितव्यासाठी त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे संरक्षण व संगोपन या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना राज्य शासनाने परिपत्रकानुसार दिलेल्या आहेत. हातावर पोट असणाऱ्या कुटुंबामध्ये दैनंदिन पैसे कमावून आणणारा कर्ता पुरुष गेल्यामुळे उर्वरित कुटुंबाची उपासमार होण्याची वेळ आली आहे.

उपरोक्त कार्यवाही अतिशय उल्लेखनीय असून त्याच धर्तीवर पुणे शहरातील ज्या बालकांनी अथवा ज्या कुटुंबानी त्यांच्या घरातील कर्ता पुरूष गमविला आहे अशा घरातील बालकांना या योजनेमध्ये समाविष्ट करणेबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यास मान्यता द्यावी, अशी मा. मुख्य सभेकडे केली होती त्याला आज मान्यता मिळाली.

Web Titel :- Corporator Archana Patil | Survey of missing children to be held! Main meeting approves the demand of corporator Archana Tushar Patil

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corporation | मोबाईल टॉवर मिळकतकर वसुली ! महापालिकेने उच्च न्यायालयात मांडली बाजू; स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती

Chitra Wagh | ‘मुख्यमंत्र्यांनी पाठवलेलं पत्र म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैवं’ – चित्रा वाघ

Mumbai Crime | ‘सेक्स टॉय’ आणि ‘अंतर्वस्त्रे’ पाठवून दिला जातोय अभिनेत्रीला त्रास