Corporator Archana Tushar Patil | नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांच्या विकास निधीतून प्रभाग 19 मध्ये 3 कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Corporator Archana Tushar Patil | प्रभाग क्रमांक 19 मध्ये (Prabhag 19) नगरसेविका अर्चना तुषार पाटील (Corporator Archana Tushar Patil) यांच्या विकास निधीतून 3 कोटीच्या विकास कामाचे भूमिपूजन (development funds of Corporator Archana Patil ) करण्यात माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे (Ex Minister Dilip Kamble) व शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांच्या हस्ते करण्यात आले.

माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे म्हणाले, प्रभागातील गोर गरीब जनतेला लुबडण्याचे काम येथील काँग्रेस ने केले. हीच गुंडगिरी संपवण्यासाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी नगरसेविका अर्चना पाटील आणि तुषार पाटील काम करतायेत. 2019 ला कशी साथ पाटील कुटुंबाला आणि भाजप ला दिली तशीच साथ 2022 ला पण द्या.

जगदीश मुळीक म्हणाले, एकाच दिवसामध्ये तब्बल 21 कामाचे भूमिपूजन होतंय, याबद्दल मी अर्चना पाटील आणि तुषार पाटील यांचे अभिनंदन करतो. त्यांनी काँग्रेस सारखा गाजावाजा न करता कामाला महत्त्व दिलाय. कारण त्यांच्या मनामध्ये आणि विचारा मध्ये प्रभागाचा विकास हा एकाच ध्यास आहे. (Corporator Archana Tushar Patil )

नगरसेविका अर्चना तुषार पाटील म्हणाल्या, तुम्ही दाखवलेला विश्वास हा माझ्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे. तुमच्या विश्वसामुळे प्रभागाचा विकास करू शकले. तुम्हाला दिलेले वचन पूर्ण करताना खूप जास्त समाधान वाटतय. आता प्रभागाच्या विकासावर काम केले आणि ते करत राहणार पण इथून पुढे प्रभागातील प्रत्येक महिला आणि आणि तरुण वर्ग सक्षम करण्यासाठी मला काम करायचं आहे. यासाठी तुमची अशीच साथ मला 2022 ला पण द्या. असे आवाहन नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांनी केली.

यावेळी माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक,
आमदार सुनील सुनील कांबळे (MLA Sunil Kamble) , सुखदेव अडागळे, सनी अडागळे,
विकी ढोले, दिनेश रासकर, मुनावर रामपुरी, रेहमान शेख ,
आशिष झांझोत, संध्या पवार, परवीन तांबोळी, राईस शेख, पुष्पक चव्हाण,
मनीषा गायकवाड तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष तुषार पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन बंडू चरण यांनी केले.

Web Title : Corporator Archana Tushar Patil | Bhumi Pujan of 3 crore development works in
Ward 19 from the development fund of corporator Archana Tushar Patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे हि वाचा

 

Vitamin And Mineral For Health | इम्यूनिटी, हाडे, मेंदू आणि डोळे मजबूत बनवतात व्हिटॅमिन A,B,C,D; ‘हे’ मिनरल सुद्धा आवश्यक, जाणून घ्या

Uric Acid | तुमच्या शरीरात होत असेल ‘ही’ समस्या, तर यूरिक अ‍ॅसिड वाढल्याचा असू शकतो संकेत; जाणून घ्या

Covid-19 vs Influenza | सर्दी-ताप, डोकेदुखीची लक्षणे ‘कोविड’ची आहेत की ‘फ्लू’ची, हे कसे ओळखावे? जाणून घ्या