Corporator Archana Tushar Patil | पुणे पालिकेत उभारणार क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांचे तैलचित्र

नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांच्या प्रस्तावाला पक्षनेत्यांच्या बैठकीत मान्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Corporator Archana Tushar Patil | क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे (Krantiveer Lahuji Vastad Salve) यांचे तैलचित्र पुणे महानगरपालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) नवीन इमारती मध्ये उभारण्यात येणार असून या तैलचित्राचा संपूर्ण खर्च नगरसेविका अर्चना तुषार पाटील (Corporator Archana Tushar Patil) करणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

आद्यक्रांतीकारक लहुजी वस्ताद साळवे हे भारतीय क्रांतिकारक (Indian Revolutionary) होते. लहुजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे (Raghoji Salve) अतिशय पराक्रमी होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) सैन्यात लहुजींच्या पूर्वजांनी अनेक पराक्रम केले आहेत. अशा वीर पराक्रमी थोर महापुरुष आद्यक्रांतीकारक लहूजी वस्ताद साळवे यांचे तैलचित्र पुणे पालिकेत उभारण्यात यावे. त्यांचा इतिहास नागरिकांना कळवा असा प्रस्ताव नगरसेविका अर्चना पाटील यांनी दिला होता. या प्रस्तावाला पक्षनेत्यांच्या बैठकीमध्ये एक मताने मंजुरी मिळाली.

आद्यक्रांतीकारक लहुजी वस्ताद साळवे यांचे तैलचित्र नवीन इमारती मध्ये उभारण्यात येणार आहे. याचा मला जास्त आनंद होत आहे.
या तैलचित्रामुळे लहूजी वस्ताद साळवे यांचा इतिहास सामान्यांना माहिती होईल. अनेक अनेक तरुणांना विद्यार्थ्यांना तैलचित्रामुळे माहिती मिळेल.
हा प्रस्ताव मंजूर केल्याबद्दल मी पक्षनेत्यांचे मनापासून आभार मानते.

Web Title :  Pune Municipal Corporation (PMC) Krantiveer Lahuji Vastad Salve
Corporator Archana Tushar Patil 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes ची 4 सर्वात मोठी कारणे, ‘या’ वाईट सवयी आजच सोडा, जाणून घ्या कोणत्या

 

Best Foods For Sound Sleep | रात्री शांतपणे झोपायचे असेल तर,
बिछान्यात जाण्यापूर्वी आवश्य खा ‘या’ 5 वस्तू

 

Weight Loss Kadha | वजन कंट्रोल करण्यासाठी परिणामकारक आहे ‘हा’ एक काढा