नगरसेवक गफुर पठाण सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर; कोंढव्यातील कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले कौतुक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अ‍ॅड. गफुर पठाण हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. अ‍ॅड. पठाण यांच्या पुढाकाराने सुरु झालेले हे कोविड केअर सेंटर कोंढव्यातील नागरिकांसाठी फायदेशीर ठरेल, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.

पुणे महापालिका, नॉलेज पार्क चैरिटेबल ट्रस्ट व दि मुस्लिम फाऊंडेशन यांच्या विद्यमानाने व कार्यक्षम नगरसेवक अ‍ॅड. हाजी गफुर पठाण यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले. यावेळी अजित पवार बोलत होते.

याप्रसंगी आमदार चेतन तुपे, आमदार सुनिल टिंगरे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेविका नंदाताई लोणकर, हाजी फिरोज शेख, रईस सुंडके, इम्तियाज शेख, डॉ.ताहिर शेख अब्दुल बागवान आदि उपस्थित होते. सेंटरवर नारायण लोणकर, उपायुक्त संदीप कदम, सहायक आयुक्त किशोरी शिंदे, जावेद पठाण आदि उपस्थित होते.

नगरसेवक पठाण यांनी पोलिसनामा ला सांगितले की कोंढवा भागात कोरोना रुग्णांवर चांगले उपचार होतील, अशा कोविड केअर सेंटरची आवश्यकता होती.

कोरोनाच्या रुग्णांना बेड मिळण्यामध्ये त्रास होत होता. तसेच तिसर्‍या लाटेच्या दृष्टीने अधिक तयारी असावी, या हेतूने नगरसेवक अ‍ॅड. हाजी गफुर पठाण यांच्या पुढाकाराने कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑनलाईन या सेंटरचे उद्घाटन केले. यावेळी अजित पवार यांनी सांगितले की, अ‍ॅड. गफुर पठाण हे नेहमीच नागरिकांच्या हिताची कामे करत असतात. तसेच नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. प्रशासनाने लागू केलेले निर्णय पाळावे त्यामुळे या कोरोनाविरुद्धची लढाई आपण नक्कीच जिंकु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.