नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे पद वाचविण्याचे मार्ग संपुष्टात

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन

भाजपचे कुंदन गायकवाड यांच्या नगरसेवक पदाबाबतचा रितसर अभिप्राय पालिकेच्या कायदा विभागाने आयुक्त श्रावण हार्डीकर यांना कळविला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गायकवाड यांचे पद शाबूत ठेवण्याचे मार्ग आता संपुष्टात आले आहेत. त्याला अनुसरून कायदा विभागाचा अभिप्राय असल्याने आयुक्त हार्डीकर यांनी घेतलेला निर्णय मागे घेता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5e3a1c70-d08e-11e8-aca8-6d2f4dab5a6a’]
बुलडाणा जात प्रमाणपत्र समितीने आपले अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र रद्द केल्याच्या निर्णयाला नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. प्रमाणपत्राची पुर्नतपासणी करण्याचे निर्देश नागपूर खंडपीठाने पडताळणी समितीला दिले असल्याची माहिती भाजपचे माजी नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी दिली होती. न्यायालयाच्या निर्णयामुळे आपले नगरसेवक पद रद्द केल्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी मागे घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

गायकवाड यांचे नगरसेवक पद रद्दचा निर्णय मागे घेण्यासंदर्भात पालिकेच्या कायदा विभागाचा अभिप्राय मागविण्यात आला होता. त्यानुसार कायदा विभागाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अभिप्राय कळविला आहे. त्यानुसार आयुक्त हार्डीकरांनी नगरसेवक पद रद्दचा घेतलेला निर्णय मागे घेण्यात येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गायकवाड यांचे पद कायमचे रद्द झाल्याचे मानले जात आहे. मात्र, यासंदर्भात आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.