नगरसेविका मंजुषा नागपूरे यांच्या प्रयत्नातून शाळेमध्ये ‘सॅनेटरी नॅपकिन वेन्डिंग मशिन’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गुप्ते हॉस्पिटल चे अस्मिता मेडिकल फाउंडेशन व नगरसेविका मंजुषा नागपुरे यांच्या संयुक्त प्रयत्नातून ज्ञानगंगा शाळेमध्ये Sanitary napkin vending Machine देण्यात आले.

मुलींच्या आरोग्याबाबत काम करणाऱ्या गुप्ते हॉस्पिटल मधील अस्मिता मेडिकल फाउंडेशन ने आपल्या UDAAN प्रकल्पांतर्गत, ज्ञानगंगा शाळेला सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन ही आगळी वेगळी भेट दिली. यासाठी नगरसेविका मंजुषा नागपुरे यांची त्यांना मदत मिळाली. यासाठी झालेल्या कार्यक्रमामध्ये “महिला प्रजजन संस्था” या विषयावर एक सेमिनार संस्थेच्या दर्शिका सुगंधी यांनी घेतले. दर्शिका सुगंधी यांनी या क्षेत्रात तसेच स्वच्छ भारत अभियानात विशेष कार्य केले असून त्यांच्या कार्याची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे.

सॅनिटरी नॅपकिन चा वापर, त्याची विल्हेवाट, आरोग्याची काळजी यासारख्या विविध विषयांवर त्यांनी मुलींना मार्गदर्शन केले. अस्मिता ही संस्था मनपा बरोबर काम करत असून वापरलेले सॅनिटरी नॅपकिन्स गोळा करणे आणि त्यांची योग्य विल्हेवाट करणे यासाठी देखील प्रयत्न करते. 4 विद्यार्थिनी आणि एक शिक्षिका यांची एक संयुक्त कमिटी शाळा स्तरावर स्थापन केली असून प्रकल्पाच्या देखरेखीची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. सदर कार्यक्रमास नगरसेविका मंजूषा दीपक नागपुरे, गुप्ते हॉस्पिटल चे सी ओ ओ नितीन गुप्ते, फाऊंडर मेंबर अविनाश जोशी, संस्थेच्या दर्शिका सुगंधी, मुख्याध्यापक, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी नगरसेविका नागपुरे म्हटल्या, महिला व विशेषतः मुलींच्या आरोग्याबाबत आम्ही जागृत असून, सिंहगड रस्त्यावरील पहिला सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल प्लांट माझ्या प्रयत्नातून चालू झाला. असे कार्यक्रम प्रत्येक शाळेत करण्याचा आमचा मानस असून त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत.