नगरसेवक पवार यांच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा जामीन फेटाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पंढरपूर येथील नगरसेवक संदिप पवार खुन प्रकरणातील मुख्य आरोपीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात पंढरपुर येथील नगरसेवक संदिप पवार यांचा भरदिवसा खुन करण्यात आला होता. सदर प्रकरणी मयत पवार यांची आई सुरेखा दिलीप पवार यांनी फिर्याद दिली होती. त्या प्रकरणी पोलिसांनी भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य गोपाळ बाजीराव अंकुशराव यांना अटक केली होती. त्याच्यासह २१ आरोपींवर पोलिसांनी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली होती.

आरोपी अंकुशराव याने जामिनासाठी अर्ज केला होता.सरकार पक्ष तर्फे जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार व मुळ फिर्यादी तर्फे अ‍ॅड. हेमंत झंजाड यांनी जामिन अर्जास विरोध केला. आरोपी अंकुशराव हाच गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असुन त्याच्या सूचने प्रमाणे खुन करण्यात आला. साक्षीदारंचे जबाबानुसार त्याचा खुनात सहभाग स्पष्ट होत आहे. तसेच पोलिसांनी केलेल्या तपासत सुद्धा आरोपीचा सहभाग स्पष्ट होतो असा युक्तिवाद सरकार पक्षाने केला. तर आरोपीचा गुन्ह्यात सहभाग नाही. त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलानी केला. न्यायाधीश ए.एन.शिर्सिकर यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकुन आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.