पुणे महापालिकेतील सात नगरसेवकांचे पद होणार रद्द

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

विहित मुदतीत जात प्रमाणपत्र सादर न केल्याने पुण्याच्या सात नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द होणार आहे. त्यामध्ये ५ भाजपचे तर २ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवकांचा समावेश आहे. या संबंधीचा अंतीम निर्णय नगरविकास विभाग घेणार आहे. तशी शिफासर पालिका आयुक्त नगरविकास विभागाकडे करणार आहेत.
[amazon_link asins=’B0784D7NFX,B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3ead5669-b4fe-11e8-a36f-f3c9861d204c’]

पुण्यामधील नगरसेवकांना विहित मुदतीत जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सांगण्यात आले होते. मात्र, सात नगरसेवकांनी विहित मुदतीत जात प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सात नगरसेवकांच नगरसेवक पद रद्द केले जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पुणे पालिकेतील नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द होणार असल्याने एकच खळबळ उडाली आहे. सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांचा यामध्ये समावेश आहे. नगरसेवकांना मोठा दणका बसल्यामुळे दोन्ही पक्षाची मोठी अडचण झाली आहे.

पोलीसनामा न्युज
पुण्यातील ब्रेकिंग तसेच राज्यासह देशविदेशातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पोलिसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा…
https://t.me/policenamanews