Corporator Pramod Bhangire | …तर कुणाची गय केली जणार नाही, नगरसेवक प्रमोद भानगिरे यांचा इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Corporator Pramod Bhangire | विकास कामा मध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर गय केली जाणार नाही. याआधी मी शांत होतो, पण आता शांत बसणार नाही. कोणी आडवं आले तर त्याला आडवे केल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे (Corporator Pramod Bhangire) यांनी विरोधकांना दिला आहे. प्रभाग क्रमांक 26 मध्ये केलेल्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Former MP Shivajirao Adhalrao Patil) यांच्या हस्ते झाला. त्यावेळी नगरसेवक प्रमोद भानगिरे (Corporator Pramod Bhangire ) बोलत होते.

प्रभाग क्र. 26 मध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगरपालिकेचे (Pune Municipal Corporation) नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे (Corporator Pramod Bhangire) यांच्या प्रयत्नातून शाहिद सौरभ फराटे (Saurabh Farate) चौक तसेच अहिल्याबाई होळकर चौक (Ahilyabai Holkar Chowk) यादरम्यानचे सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा माजी खासदार शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, प्रभाग क्र 26 मधील पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवणार असल्याचे सुचक वक्तव्य त्यांनी केले. यामध्ये काळेपडळ व हंडेवाडी रोडच्या पाणी टंचाईवर ज्यांनी राजकारण केले त्यानां सूचक इशारा दिला. येणाऱ्या 15 फेब्रुवारी पर्यंत आपला प्रभाग पाणी टंचाई मुक्त होईल अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच प्रभाग क्र 26 स्मार्ट प्रभाग होत आहे, या पुढच्या काळात तुम्ही असेच शिवसेनेच्या (Shivsena) पाठीशी उभे राहाल अशी आशा आढळराव पाटील यांनी व्यक्त करुन पुणे महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवणार असल्याचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले.

यावेळी राजेंद्र बाबर यांनी आभार व्यक्त केले. या प्रसंगी शिवसेना पक्षाचे विजय देशमुख, राजेंद्र बाबर, देवेंद्र भाट, अभिमन्यू भानगिरे, इम्तियाज शेख, उल्हास तुपे, संजय संपकाळ, सचिन तरवडे, गौरव गायकवाड, मनीषा डाळींबकर,वैशाली काळे, नूरजहाँ मुल्ला, विद्या होडे,वर्षाराणी फरांदे, जानमोहम्मद शेख, प्रवीण हिलगे, नाना बारगुळे, संतोष जाधव, विश्वास पोळ, जाधव, कमांडर जयंत ढोपे, सर्व सोसायटी चे नागरिक काळेपडळ भागातील सर्व नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Web Title : Corporator Pramod Bhangire News

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Skin Care Tips-Raw Milk | जर हवा असेल क्लिअर आणि चमकदार चेहरा वापरा कच्चे दूध

Heart Patients Winter । हिवाळ्यात हृदयाच्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी

Mother And Son Dance Video | आई-मुलाच्या जोडीने उडवली खळबळ,
‘नाच मेरी रानी’ गाण्यावर डान्स पाहून नोरा फतेहीला देखील पडेल भुरळ

Priyanka Chopra | प्रियांका चोप्रा होणार आई, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

Pushpa Movie Mistakes | ‘पुष्पा’च्या सीनवर जिथे टाळ्या वाजल्या, तिथे झाली एवढी मोठी चूक,
अल्लू अर्जुनच्या चित्रपटात झाल्या ‘या’ 5 मोठ्या चुका

Ilena D’Cruz Oops Moment | ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केल्याने इलयाना डीक्रूझ झाली ‘Oops Moment’ची शिकार