Corporator Pramod Bhangire | प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नगरसेवक प्रमोद भानगिरे यांच्यावतीने मैदानी स्पर्धांचे आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रजासत्ताक दिनाचे (Republic Day) औचित्य साधून नगरसेवक प्रमोद भानगिरे (Corporator Pramod Bhangire) यांच्या हडपसर (Hadapsar) भागातील प्रभाग 26 मध्ये विविध मैदानी खेळांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक प्रमोद भानगिरे (Corporator Pramod Bhangire) आणि सोल्जर युथ फाऊंडेशनच्या (Soldier Youth Foundation) सहकार्याने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदानावर (Balasaheb Thackeray Football Ground) या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रीय पाटील तालीम संघाचे अध्यक्ष व माजी स्वीकृत नगरसेवक उल्हास तुपे (Ulhas Tupe) यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांना पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करून झेंडावंदन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी नगरसेवक प्रमोद भानगिरे (Corporator Pramod Bhangire), संतोष भानगिरे, अभिमन्यू भानगिरे, सचिन भानगिरे, डॉ.बालगुडे, संतोष जाधव, अमित गायकवाड, अमित दाभाडे, नीता भोसले, अॅड.माने, विद्या होडे, वैशाली काळे, राणी फरांदे, नाना बारगुळे हे उपस्थित होते

यावेळी लहान मुलांनी मल्लखांब (Mallakhamb), कराटे (Karate), रोप वे (Ropeway), 17 मजली इमारती वरून रेपलिंग, आपल्या शरीराच्या साह्याने कौले फोडणे, फायर वॉक, मर्दानी खेळ, सेल्फ डिफेन्स, तलवार बाजी, लाठी काठी सेल्फ डिफेन्स, नानचाकू फिरवणे, झेंड्याला मानवंदना, एनसीसी परेड NCC Parade (आण्णासाहेब महाविद्यालय विद्यार्थी), देश भक्ती गीत नृत्य, अशा प्रकारच्या कला यावेळी सादर करण्यात आल्या. मोबाईलचा वापर कमी करून व्यायाम, मुलींनी आपले संरक्षण कसे करावे, माती मधील खेळ याला किती महत्व द्यावे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला व भारतचे भविष्यात तरुण-तरुणी कसे घडतील हेच उत्तम उदाहरण हे दाखवून दिले.

File photo

 

कार्यक्रमाचे नियोजन सोल्जर युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष फाऊंडर तुषार कदम, सुधीरचंद्र जगताप (प्रशासकीय अधिकारी),
वसंत आजमाने (ट्रेनिंग ऑफिसर), सुजाता हलपतराव (ट्रेनिंग ऑफिसर), शिवकन्या बेळगे (प्रशासकीय अधिकारी),
मीरा बाबर (मार्केटिंग ऑफिसर) दीनानाथ बाविस्कर (मार्केटिंग ऑफिसर), रामदास मदने (उपाध्यक्ष),
बाळासाहेब आबनावे (अकाउंट ऑफिसर), प्रताप भोसले, अशोक जाधव (जॉइंट सेक्रेटरी), पुरुषोत्तम काळे (सेक्रेटरी),
प्रकाश घाटकर (अकाउंट ऑफिसर), किरण चौधरी, जयपाल दगडे पाटील (डिजास्टर मॅनेजमेंट ऑफिसर),
नरेश गोला (डायरेक्टर डी एफ एल) व सर्व माजी आजी सैनिक पदाधिकारी यांनी केले. सूत्रसंचालन वर्षा पाटील,
अभिजीत बाबर यांनी केले. आभार तुषार कदम यांनी मानले

File photo

 

Web Title : Corporator Pramod Bhangire | Organizing field competitions on behalf
of corporator Pramod Bhangire on the occasion of Republic Day

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे, पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या