Advt.

Corporator Pramodnana Bhangire | पुणे मनपामध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये नगरसेवक प्रमोदनाना भानगिरेंच्या प्रयत्नातून विकासकामे, माजी राज्यमंत्री शिवतारेंच्या हस्ते भूमिपूजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Corporator Pramodnana Bhangire | पुणे शहरात नविन समाविष्ट झालेल्या गावामध्ये विकास कामासाठी दत्तक घेतलेल्या शिवसेना नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे (Corporator Pramodnana Bhangire) यांच्या प्रयत्नातून शिवसेनेचे नेते आणि मा. राज्यमंत्री, संपर्क प्रमुख विजयबापू शिवतारे (Vijay Shivtare) यांच्या शुभहस्ते भूमिपूजन संपन्न झाले.

 

पुणे महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे (Corporator Pramodnana Bhangire) यांच्या विशेष प्रयत्नातून होळकरवाडी व औताडवाडी येथे विविध ठिकाणी ड्रेनेज रस्ते विषयक कामे तसेच पेव्हिंग ब्लॉक बसवणे व हायमस्ट लाईट बसवणे व औताडवाडी सभागृह चे रंगरंगोटीच्या कामास सुरवात केली.
या पुढच्या काळात आपल्या भागात पाणी, रस्ते ,ड्रेनेज, लाईट कचरा व्यवस्था यावर विशेष लक्ष देऊन
नागरिकांच्या मूलभूत अडचणी सोडवणार असे आश्वासन नाना भानगिरे यांनी दिले.
मा, राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांनी नाना भानगिरे यांना पुणें शहरात नव्याने समाविष्ट केलेल्या आंबेगाव ते फूरसुंगी या गावामध्ये विशेष लक्ष देऊन इच्छुक उमेदवारांना पुणे महानगरपालिका मधील कारभार कसा चालतो या संबंधी आपल्या अनुभवाचे कौशल्य द्यावे व येणाऱ्या पुणे महानगरपालिकाच्या निवडणुका मध्ये शिवसेनेचा भगवा फडकवा अशी इच्छा व्यक्त केली.

 

यावेळी दिलीप आबा यादव, उल्हास दादा शेवाळे, संतोष खोटे, सोमनाथ करे, राजू भाडळे, नाना होळकर,
सरपंच श्रध्दा झांबरे, राकेश झांबरे , पांडुरंग औताडे, दत्ता होळकर, नानासाहेब पठारे, अजय झांबरे,
विकास शेवाळे, मनीषा ताई होळकर, मानसी जांबरें, डॉक्टर खिलारे साहेब, संतोष खोटे, गणेश वाडकर,
राकेश झांबरे, प्रदीप पठारे, सर्व ग्रामस्थ, महिला, नाना भानगिरे आयोजक टीम उपस्थित होते.

 

Web Title :- Corporator Pramodnana Bhangire | Development works in the newly included villages in Pune Municipal Corporation through the efforts of corporator Pramodana Bhangire

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा