नगरसेवक रविंद्र धंगेकर यांचा अटकपुर्व जामीन फेटाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे नगरसेवक रविंद्र धंगेकर यांचा अटकपुर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे.

महापौरांच्या दालनात जलपर्णीच्या निविदेवरून सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान उत्तर देण्यासाठी आलेल्या अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकऱणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अरविंद शिंदे, रविंद्र धंगेकर यांच्यासह १५ ते १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अऱविंद शिंदे यांनी अटकपुर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांना न्यायालयाने तात्पुरता अटकपुर्व जामीन दिला आहे. तर रविंद्र धंगेकर यांनीही याप्रकरणी अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला होता. याप्रकरणात न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू बुधवारी ऐकून घेतली. त्यानंतर गुरुवारी त्यांचा जामीन फेटाळण्यात आला.

…तर मी शरद पवारांच्या विरोधात निवडणूक लढेल
जम्मूमध्ये CRPF च्या ताफ्यावर अतिरेकी हल्ला ; १३ जवान शहिद 
शिवसेना म्हणे पीएम तुमचा तर सीएम आमचा ; काय होणार युतीच ?