Corporator Vasant More | खासदार निधीतून बसविलेली 15 टॉयलेटस् बंद अवस्थेत; उभारण्यासाठी केलेला 2 कोटींचा खर्च संबधित लोकप्रतिनिधींकडून वसुल करावा – मनसेची मागणी

पुणे – पोलीसनामा ऑनलाइन – Corporator Vasant More | माजी खासदार अनिल शिरोळे (Former MP Anil Shirole) यांनी खासदार निधीतून बसविण्यात आलेले १५ ई टॉयलेटस् (e-Toilet in Pune) बसविल्यानंतर अल्पावधीतच नादुरूस्त होउन बंद पडले आहेत. या टॉयलेटस्साठी खर्च करण्यात आलेले २ कोटी रुपये हे माजी खासदार, शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार (Shivajinagar MLA) आणि ज्या नगरसेवकांच्या प्रभागात बसविण्यात आले आहेत, त्या नगरसेवकांच्या मानधनातून वसुल करावेत अशी मागणी मनसेचे शहर अध्यक्ष वसंत मोरे (Corporator Vasant More) यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

याप्रसंगी मनसेच्या पर्यावरण विभागाचे शहर अध्यक्ष नितीन जगताप (MNS Nitin Jagtap) उपस्थित होते. मोरे यांनी सांगितले, की भाजपचे माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार निधीतून २०१८ मध्ये शहरात ११ ठिकाणी १५ अत्याधुनिक ई टॉयलेटस् बसविण्यात आले होते. यापैकी ९ टॉयलेटस् ही एकट्या शिवाजीनगर मतदारसंघातील प्रभाग क्र. १४ मध्ये बसविण्यात आली आहेत. शिरोळे यांचे चिरंजीव सिद्धार्थ शिरोळे हे या प्रभागाचे नगरसेवक आणि २०१९ मध्ये मतदारसंघाचे आमदारही झाले आहेत. केवळ विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम राबविण्यात आला. तर अन्य भागातील टॉयलेटस् ही अगदी मागीलवर्षी फेब्रुवारीमध्ये व भाजपच्याच नगरसेवकांच्या प्रभागात बसविण्यात आली आहेत.

यापैकी ७० टक्क्यांहून अधिक ई टॉयलेटस् ही सध्या अस्तित्वात असलेल्या सार्वजनिक शौचालयांच्या भोवतीच बसविण्यात आली आहेत. आजमितीला सर्वच्या सर्व ई टॉयलेटस् बंद आहेत. टॉयलेटस्च्या अंतर्गत भागाची फोडतोड झाली असून बसविल्यानंतर अल्पावधीतच बहुतांश ठिकाणची टॉयलेटस् बंद केली गेली आहेत. खासदार निधीचा पैसा हा जनतेतूनच गोळा करण्यात येतो. परंतू केवळ पुत्रप्रेमापोटी त्याची अशा पद्धतीने उधळपट्टी केली गेली आहे. ही टॉयलेटस् उभारण्यासाठी खर्च करण्यात आलेले दोन कोटी रुपये माजी खासदार शिरोळे, त्यांचे चिरंजीव आमदार सिद्धार्थ शिरोळे (MLA Siddharth Shirole) व भाजपच्या संबधित नगरसेवकांच्या मानधनातून वसुल करावी, अशी मागणी मोरे (Corporator Vasant More) यांनी यावेळी केली.

Web Title : Corporator Vasant More | 15 toilets installed from MP fund are closed; Expenditure of Rs 2 crore for erection should be recovered from the concerned people’s representatives – demand of MNS

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे हि वाचा

 

Vitamin And Mineral For Health | इम्यूनिटी, हाडे, मेंदू आणि डोळे मजबूत बनवतात व्हिटॅमिन A,B,C,D; ‘हे’ मिनरल सुद्धा आवश्यक, जाणून घ्या

Uric Acid | तुमच्या शरीरात होत असेल ‘ही’ समस्या, तर यूरिक अ‍ॅसिड वाढल्याचा असू शकतो संकेत; जाणून घ्या

Covid-19 vs Influenza | सर्दी-ताप, डोकेदुखीची लक्षणे ‘कोविड’ची आहेत की ‘फ्लू’ची, हे कसे ओळखावे? जाणून घ्या

Aloe Vera Juice Benefits | रोज प्याल एलोवेरा ज्यूस तर शरीराला होतील ‘हे’ 5 फायदे; जाणून घ्या

Maratha Reservation | उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या घरावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धडकणार ‘लाँग मार्च’ (व्हिडिओ)

Mahavikas Aghadi | राष्ट्रवादी-शिवसेनेत वादाची ठिणगी ! आघाडी न करण्याची महापौरांची भूमिका

Vistadome Coach | मध्य रेल्वेवरील ‘व्हिस्टाडोम कोच’ना प्रचंड प्रतिसाद ! गेल्या 3 महिन्यात 20,407 प्रवाशांची नोंद, उत्पन्न रु.2.38 कोटी

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 41 हजारांपेक्षा जास्त रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी