Corporator Vasant More | पुण्याचे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे पक्षाच्या WhatsApp ग्रुपमधून लेफ्ट; मनसेतील अंतर्गत धुसफूस वाढतेय ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Corporator Vasant More | गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ‘मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा आम्ही मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू,’ असा इशारा दिला होता.
त्यानंतर राज्यात वादंग निर्माण झालं. दरम्यान आता मनसे पक्षात अंतर्गत धूसफूस दिसून येत आहे.
यानंतर ‘ठाकरे यांच्या भाषणामुळे आपण बेचैन असल्याचे,’ मत पुण्याचे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक वसंत मोरे (Corporator Vasant More) यांनी व्यक्त केले आहे.

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे पुण्यामधील (Pune News) एका मुस्लिम पदाधिकाऱ्यानेही पक्षाचा राजीनामा दिला होता.
त्याचबरोबर राज्यातील अनेक मुस्लिम पदाधिकारी नाराज असल्याचे सांगण्यात येतेय.
यानंतर आता पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे (Corporator Vasant More) यांनी मनसेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून बाहेर (लेफ्ट) पडल्याची माहिती समोर येत आहे.
उपविभाग प्रमुख, उपशहर प्रमुख या ग्रुपमधून वसंत मोरे यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.
पक्षबांधणीसाठी बनवलेल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये (WhatsApp Group) मतभेद दिसून येत असल्याने आणि चर्चा टाळण्यासाठी वसंत मोरेंनी ग्रुप सोडल्याचे म्हटले जातेय.
अशी माहिती एका मराठी वृत्तवाहिनीकडून मिळत आहे.

राज ठाकरे यांनी पुण्यातील महत्वाच्या नेत्यांना आज शिवतिर्थावर आमंत्रित केलं आहे.
दरम्यान पुणे शहराध्यक्ष वंसत मोरे यांना निमंत्रण न दिल्याची माहिती समोर येत आहे.
मनसेचे नेते राजेंद्र वागसकर (Rajendra Wagaskar), अनिल शिदोरे (Anil Shidore) आणि मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर (Sainath Babar) यांना राज ठाकरे यांनी मुंबईत (Mumbai) बोलावलं आहे.
दरम्यान, पक्षाच्याच नगरसेवकांनी त्या भाषणामुळे मी बेचैन आहे असे म्हणणे योग्य नाही, असं मत मनसेचे नेते राजेंद्र वागसकर यांनी म्हटले.
तर, 9 मार्च रोजी ठाण्यात (Thane) आयोजित सभेत खुद्द पक्षाध्यक्ष राज ठाकरेच त्यावर बोलणार आहेत, त्यातून मोरे यांचे समाधान होईल असं त्यांनी म्हटलंय.

 

दरम्यान, ”मी शहराध्यक्ष असलो तरी एक लोकप्रतिनिधी आहे, माझ्या प्रभागातील मुस्लिम मतदार नाराज होत असतील,
भयग्रस्त होत असतील तर मला त्याची काळजी करायलाच हवी.
राज ठाकरेंवर नाराज नाही, मात्र बेचैन आहे, प्रत्यक्ष त्यांची भेट घेऊन यावर बोलेन,” असं मनसेचे पुणे शहराध्यक्ष वंसत मोरे यांनी म्हटलं होतं.

 

 

Web Title :-  Corporator Vasant More | mns corporator vasant more has decided to leave mns whatsapp group pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा