अज्ञातांकडून नगरसेवकास बेदम मारहाण

सातारा : पोलीसनामा आॅनलाईन – कोरेगाव एका नगरसेवकाला सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास शहरातील अज्ञात युवकांनी बेदम मारहाण केली. कोरेगाव शहरातील घटनास्थळावरून मिळालेली माहितीनुसार, कोरेगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयासमोर नगरसेवक गेला असता, त्या ठिकाणी काही युवकांनी या नगरसेवकाला बेदम मारहाण केल्याची जोरदार चर्चा कोरेगाव शहरात होती.

कोरेगाव नगर पंचायतीमध्ये स्थानिक बाजार पेठेतील फळविक्रेते, भाजी विक्रेते, टपऱ्या आठवडा बाजारसहित कोरेगाव शहरातील फेरीवाले यांची दैनंदिन करवसुलीचा ठेका कोरेगाव नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नगर पंचायतीचे सर्व नगरसेवक यांच्या कायदेशीर परवानगीने कोरेगाव शहरातील राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याला देण्यात आला होता. दैनंदिन करवसुलीबाबत एका नगरसेवकाने नगरपंचायतीच्या मासिक मिटींगमध्ये आक्षेप नोंदवले तसेच तक्रारी केल्या. हा ठेका बदलण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे केली. याचा राग मनात धरून अज्ञात युवकांनी नगरसेवकास बेदम मारहाण केल्याचे म्हटले जात आहे. या घटनेची उलट सुलट चर्चा दिवसभर कोरेगाव शहरात सुरू होती.