भाजप खासदारांवर संतापले नगरसेविकेचे पतिदेव

अहमदनगर : पोलीसनामा आॅनलाइन – भाजपचे निष्ठेने काम करुनही बाहेरच्यांना उमेदवारी मिळते आणि आमची उमेदवारी नाकारली जाते. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष खा. दिलीप गांधी यांनी बालहट्ट पुरवत आमची उमेदवारी नाकारली असली तरी त्यांनी उमेदवारी नाकारण्यामागचा एक तरी निकष जाहीरपणे सांगावा, असे आव्हान पक्षाचे इच्छुक उमेदवार सी. ए. ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे यांनी दिले असून पार्टी विथ डिफरन्स म्हणून घेणाऱ्या पक्षाची ओळख आता पार्टी विदाऊट डिफरन्स अशी झाल्याचे ते म्हणाले.

प्रभाग क्र. ६ मधून इच्छुक असलेले सीए काळे हे भाजपच्या विद्यमान नगरसेविका मनिषा बारस्कार-काळे यांचे पती असून भाजपने त्यांची उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी पत्नी नगरसेविका काळे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच निवडणूक लढविणारच अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. पक्षाने कोणतेच कारण न देता उमेदवारी नाकारल्याचे त्यांनी सांगत आतापर्यंत पक्षविरोधी कारवाई केली किंवा पक्षाला हानी पोहचवली असे एकही कृत्य आपण केले नाही. उमेदवारीसाठी पक्षाचे जे १० निकष होते त्यापैकी कोणते निकष आम्ही पूर्ण करू शकलो नाही असे दोन तरी निकष शहराध्यक्ष खा. गांधी यांनी सांगावेत. केवळ पक्षात कोणी डोईजड होऊ नये या एकाच कारणातून त्यांनी आपली उमेदवारी डावलली असा आरोप काळे यांनी केला आहे. तसेच दारूकांडातील आरोपींना भाजपकडून उमेदवारी बहाल केल्याचा त्यांनी आरोप केला आहे.

विषप्रयोग प्रकरण : महापौरांसह तिघांची ५ तास पोलिसांकडून चौकशी 
सोलापूर :  भाजपाचे नगरसेवक सुरेश पाटील यांनी विषबाधा प्रकरणात महापौर शोभा बनशेट्टी, भाजपाचे शहर अध्यक्ष प्रा.अशोक निंबर्गी, अविनाश महागावकर, सुनिल कामाठी आणि श्रीशैल बनशेट्टी यांची नावे घेतली होती. पोलिसांच्या नोटिसीनुसार बनशेट्टी पती- पत्नी आणि प्रा. निंबर्गी हे तिघे जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांची पोलिसांनी चौकशी करून जबाब घेतला. ही चौकशी तब्बल पाच तास सुरू होती.

या तिघांच्या सोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार व कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस ठाण्यात आल्यानंतर महापौर शोभा बनशेट्टींसह तिघांची चौकशी करून वेगवेगळा जबाब नोंदवून घेण्यात आला. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत केडगे, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक बहिरट व तपास पथकातील पोलीस कर्मचारी हजर होते. चौकशी सुरू असताना भाजपाचे वीरभद्रेश बसवंती, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्याबरोबर इतर कार्यकर्ते पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. चौकशी झाल्यानंतर सायंकाळी सर्वजण घरी गेले.
नगरसेवकसुरेश पाटील यांनी अशोक निंबर्गी, शोभा बनशेट्टी, सुनील कामाटी, अविनाश महागावकर, श्रीशैल बनशेट्टी यांनी अन्नातून अथवा पेयातून विष दिल्याचा जबाब पोलिसांना दिल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी या पाच जणास नोटीस बजावून चौकशीकामी हजर राहण्यास सांगितले होते. गेले चार दिवस कोणीच जोडभावी पेठ पोलीस ठाण्याकडे फिरकले नव्हते. मात्र महापौर शोभा बनशेट्टी व त्यांचे पती श्रीशैल बनशेट्टी यांनी कोर्ट काम असल्याचे सांगून तीन दिवसांची मुदत मागितली होती.

दूध लिटर मागे ५ रुपयांनी महागणार ?