‘सही’ मधील या चुका आजच दुरूस्त करा अन्यथा आयुष्य बनू शकतं खडतर, जाणून घ्या तज्ञ डॉ. नवनीत मानधनी काय सांगतात

मित्रांनो बऱ्याचशा लोकांचा मानसिक त्रास आणि लहान मुलांमध्ये /तरुण मुलांमध्ये एक मोठा प्रॉब्लेम असतो, एकाग्रता होत नाही आणि अनेक लोकं आयुष्यात फार चडउतार पाहतात. त्यांच्या त्याबाबतच्या ज्या गोष्टी आहेत, त्या त्यांच्या सहीमध्ये लपलेल्या असतात.

तर तुमच्या सहीमध्ये अशा कोणत्या 10 गोष्टी आहेत. ज्या असू नयेत, त्याबद्दल आपण बोलणार आहोत एक एक करून….

1. सगळ्यात पहिले ज्यावेळेस तुम्ही सही करता, ती सही एका लाइनमध्ये यायला पाहिजे, वर खाली/ किंवा एक अक्षर खाली व एक अक्षर वर /अर्धे दोन चार अक्षरे खाली /अर्धे दोन चार अक्षरे वर अशी येऊ नयेत. त्यामुळे एकाग्रता भंग होते.

2. सहीच्या खाली एक लाइन नेहमी काढावी, परंतु ती लाइन जर नागमोडी (wavy) असेल म्हणजे वर खाली तरंगल्यासारखी असेल, तरी ती चांगली नसेल.

3. आपल्या सहीचे पहिले अक्षर कधीही पूर्णपणे राउंड (गोलाकार) करू नये, जी लोकं असं करतात ती स्वतःबद्दल फार लपवतात ,आपल्या कार्यक्षमतेमध्ये कमी पडतात, आपलं कार्यक्षेत्र वाढवण्यात त्यांना अपयश येते.

4. सहीच्या खाली एकापेक्षा जास्त लाइन काढणं तीन/ चार /पाच, हे वेळेचा अपव्यय तर दाखवतातच; परंतु त्यासोबतच ही व्यक्ती कधीच आयुष्यात यशस्वी होत नाही.

5. अनेक जण सहीच्या खाली किती डॉट द्यायचे हे विचारतात, जास्तीत जास्त दोन डॉट असलेले बरे आणि त्यातल्या त्यात ते मध्यभागी असलेले बरे, त्यापेक्षा जास्त असू नयेत. मुख्यतः तरुण पिढीसाठी दोनपेक्षा जास्त डॉट असणे हे अपायकारक आहे.

6. एखाद्या व्यक्तीची सही जर खाली जात असेल (down words) तर ती व्यक्ती मानसिक आजारा (depression)मध्ये जाते किंवा गेलेली असते. असा त्याचा अर्थ होतो.

7. अनेक लोकं सही करताना पहिला अक्षर स्प्रिंगसारखी लाइन काढतात. अशा लोकांची एकाग्रता बिलकुल राहत नाही.

8. अनेक जण विचारतात की, दोन भाषेत सही केली तर काय होते, अशी लोकं खूप ज्ञानी आहेत, असं दाखवतात; पण ते नसतात.

9. जी लोकं दोन भाषेत सही करतात, त्यांचे अभ्यासातसुद्धा मन लागत नाही, कारण हे एकावेळी खूप सारे काम करण्याचा प्रयत्न करतात.

10. ज्यांची सही करत असताना शब्द एकमेकांवर येत असतील, तर यांची निर्णय क्षमता फार कमी असते आणि नियोजनात चुकतात.

 

अधिक माहितीसाठी – डॉ. नवनीत मानधनी (86051 12233)

क्रमशः….