भ्रष्ट अधिकाऱ्याच्या घरी सापडलं ‘घबाड’, 13 टन सोनं व 2 लाख 62 हजार कोटी रुपये, प्रचंड खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधील एका अधिकाऱ्याच्या घरी छापा टाकला असता पोलिसांना धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या अधिकाऱ्याच्या घरी छापा मारला असता त्याच्याजवळ 13 टन सोने आणि बँकेत 2 लाख 62 हजार करोड रुपये रोख रक्कम मिळाली आहे. पॉवरफुल कम्युनिस्ट अधिकारी असलेल्या या व्यक्तीवर मोठ्या प्रमाणात लाचेच्या स्वरूपात सोने घेतल्याचा आरोप करण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी ‘झांग की’ नावाच्या अधिकाऱ्याच्या घरी छापा मारला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणात संदिग्ध वस्तू देखील मिळालेल्या आहेत. 58 वर्षीय हा अधिकारी वे हैनान प्रोविन्समध्ये मोठ्या पदावर काम करत होता त्यांना पदावरून निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर अनेक मोठी घरे देखील त्यांनी लाचेच्या स्वरूपात घेतल्याची त्याच्यावर आरोप आहे.

त्याच्यावरील हा आरोप सिद्ध झाला तर ते चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती जॅक मा यांच्यापेक्षा देखील श्रीमंत व्यक्ती ठरणार आहेत. त्यामुळे सध्या त्यांना पोलसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. दरम्यान, हैनान ची राजधानी हैकोऊ मधील कम्यूनिस्ट पार्टीचे ते सचिव देखील होते. त्याचबरोबर पक्षात त्यांच्याकडे मोठे मानाचे पद देखील होते.

 

Visit : Policenama.com

तुमच्या मुलांच्या डोळ्यांची अशी घ्या काळजी, उपाय जाणून घ्या
जाणून घ्या ‘सेक्शुअल लाइफ’ असंतुष्ट असण्याची कारणे, अशी घ्या काळजी
चिंच आहे बहुगुणी, उन्हाचा कडाका वाढला तर आवश्य खा

शरीरात ‘या’ ठिकाणी लपतो ‘एड्स’चा व्हायरस, संशोधकांनी केला दावा
मधुमेहाचे औषध स्तनाच्या कॅन्सरवर उपयुक्त, चिनी संशोधकांचे मत
मुलांना कोणत्या वयात शाळेत घालावे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
ऑफिसमध्ये जेवण करताना घ्यावी ‘ही’ काळजी, तुमच्यासाठी ठरु शकते फायदेशीर
नाभीवर लावा २ थेंब दारु, दूर होतील पीरियड्ससंबंधीत ‘या’ समस्या, जाणून घ्या