Video : नोटांचे बंडल जाळताना तुम्ही कुणाला पाहिले आहे का? सिरोहीतून समोर आला हैराण करणारा व्हिडिओ

सिरोही : वृत्तसंस्था – राजस्थानच्या सिरोहीमधून एक असा व्हिडिओ समोर आला आहे जिथे एका तहसीलदाराने लाखो रुपयांच्या नोटांचे बंडल आपल्या गॅस शेगडीवर जाळले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा वायरल होत आहे. सध्या राज्यात अँटी करप्शन ब्यूरो म्हणजे एसीबीची छापेमारी सुरू आहे. जेव्हा एसीबीची टीम सिरोही जिल्ह्यात पोहचली तेव्हा हैराण झाली. पिंडो बारात तहसीलच्या तहसीलादाराने जेव्हा घराच्या बाहेर अँटी करप्शन ब्यूरोच्या अधिकार्‍यांना पाहिले तेव्हा त्याने ताबडतोब दरवाजा बंद केला.

सिरोही जिल्ह्यातील तहसीलदार अरेस्ट
बराच वेळ एसीबीची टीम दरवाजा उघडण्यासाठी विनंती करत होते, मात्र त्याने दुर्लक्ष केले. दरम्यान बाहेरून पाहिले असता सर्वजण हैराण झाले, कारण तहसिलदार गॅस शेगडीवर लाखोंच्या नोटांचे बंडल जाळत होता आणि यामध्ये त्याची पत्नी सुद्धा त्याला साथ देत होती. यानंतर तहसिलदार कल्पेश जैनला अटक करण्यात आली आणि अर्धवट जळालेल्या नोटा जप्त करण्यात आल्या.

घरातून निघत होता धुर
एसीबीला माहिती मिळाली होती की, तहसीलदार कल्पेश जैनने एक ठेका देण्यासाठी 1 लाख रुपयांची लाच मागत आहे, ज्यानंतर एसीबी अ‍ॅक्टिव्ह झाली. जेव्हा आपल्या प्लॅननुसार एसीबीने 1 लाख रुपयांची लाच घेताना महसूल निरीक्षक परबत सिंहला अटक करण्यात आली तेव्हा समजले की, ही रक्कम कल्पेशच्या सांगण्यावरून घेतली गेली. ज्यानंतर परबतला घेऊन एसीबी टीम कल्पेशच्या घरी पोहचली. टीम पोहचताच कल्पेशने दरवाचा बंद केला आणि नोटा जाळू लागला. यामुळे घरातून धुर बाहेर येऊ लागला.

तपास सुरू
एसीबीने ताबडतोब दरवाजा तोडून घरात प्रवेश केला या दरम्यान 20 लाख रुपयांच्या नोटा अर्धवट जळाल्या होत्या. एसीबीने दिड लाख रूपये जप्त केले. सध्या एसीबी त्याच्या एकुण संपत्तीचा तपास करत आहेत.