भ्रष्टाचाराच्या पैशातून मुनगंटीवारांनी 500 कोटीचा बंगला बांधला : अमोल मिटकरी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मागील सरकारमधील नेत्यांवर आणि मंत्र्यांवर सत्ताधाऱ्यांकडून विविध मुद्यांवरून टीका आणि आरोप केले जात आहे. आता भाजपचे नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहेत. मुनगंटीवार यांनी वनमंत्री असताना वृक्ष लागवडीत मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी केला आहे.

ठाण्यातील एका जिमच्या उद्घाटन प्रसंगी मिटकरी यांनी भाजप नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. भाजपच्या काळात राबवण्यात आलेल्या 33 कोटी वृक्ष लागवड योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. तर तत्कालीन वनमंत्री मुनगंटीवार यांनी या योजनेत भ्रष्टाचार केला असून याची चौकशी करण्याची मागणी मिटकरी यांनी केली आहे.

अमोल मिटकरी यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करताना मुनगंटीवार यांनी 500 कोटी रुपयांचा बंगला बांधला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या बंगल्याच्या पाचव्या मजल्यावर पार्किंग आहे. मुनगंटीवार यांच्या बंगल्यातील रोपट्यांना देखील एसी आहे. विशेष म्हणजे मी स्वत: त्यांचा तो बंगला पाहिला असल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. मिटकरी यांच्या आरोपाला सुधीर मुनगंटीवार कसे प्रत्युत्तर देतात हे पहावे लागेल.

फेसबुक पेज लाईक करा