काय सांगता ! होय, EPFO मध्ये भ्रष्टाचार, कंपनीकडून 8 लाखांची लाच घेताना CBI चा छापा, दोन अधिकारी जाळयात

गाझियाबाद : वृत्तसंस्था – नोएडातील एका खासगी सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या कंपनीकडून थकीत टॅक्स सेटलमेंट करण्यासाठी 8 लाखाची लाच घेताना EPFO कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांना सीबीआय रंगेहाथ पकडले. नरेंद्र कुमार आणि ब्रजेश रंजन झा असे लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या दोन अधिकाऱ्यांची नावे आहेत. या दोघांना सीबीआयने नोएडा सेक्टर 24 मधील कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले आहे.

नोएडातील एका सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या कंपनीकडून थकीत 74 लाख रुपयांचा टॅक्स सेटलमेंट करण्यासाठी या अधिकाऱ्यांनी 9 लाखांची लाच मागितली होती. चर्चेमध्ये ही रक्कम 8 रुपये देण्याचे ठरले होते. यानंतर तक्रारदार यांनी भ्रष्टाचार विरोधी पथकाकडे तक्रार केली. सीबीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने पडताळी केली असता दोघांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. यानुसार सीबीआयने अकाऊंट ऑफिसर आणि ईपीएफओच्या असिस्टंट कमिश्नरविरोधात गुन्हा दाखल केला.

यानंतर सापळा रचून सीबीआयने अकाऊंट ऑफिसर आणि त्याला मदत करणाऱ्या एनफोर्समेंट ऑफिसरला 8 लाखांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. यानंतर लगेच सीबीआयने ईपीएफओ आणि दोघांच्या घरावर छापे टाकले. अटक केलेल्या नरेंद्र कुमार आणि ब्रिजेश झा याला गाझियाबादच्या सीबीआय न्यायालयासमोर हजर केले. सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायधीश अमितवीर सिंह यांनी दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याप्रकरणी ईपीएफओ कार्यालयातील इतर अधिकाऱ्यांची देखील चौकशी केली जात आहे.