Corruption In Maharashtra Education Department | राज्यातील ‘त्या’ सर्व शिक्षक, शिक्षण अधिकार्‍यांच्या उघड चौकशीसाठी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांचे अ‍ॅन्टी करप्शनला पत्र, शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड खळबळ

Corruption In Maharashtra Education Department | Education Commissioner Suraj Mandhare's letter to anti-corruption for open investigation of 'those' teachers, education officials in the state, huge excitement in the education sector
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Corruption In Maharashtra Education Department | शिक्षण क्षेत्रातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. ज्या शिक्षक, शिक्षण अधिकार्‍यांवर अ‍ॅन्टी करप्शनचे ट्रॅप Anti Corruption Trap (ACB Trap) अथवा छापे Anti Corruption Raid (ACB Raid) पडले आहेत अशा सर्वांची उघड चौकशी व्हावी यासाइी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे ( IAS Suraj Mandhare) यांनी अ‍ॅन्टी करप्शनला पत्र दिले आहे. (Corruption In Maharashtra Education Department)

शिक्षण विभागातील शिक्षक, शिक्षण अधिकारी लाच घेताना रंगेहाथ जाळयात सापडतात. मात्र, नंतर ते पुन्हा सेवेत रूजू होतात अन् पुन्हा भ्रष्टाचार करतात मात्र त्यांच्यावर अ‍ॅक्शन घेतली जात नाही (Pune News). त्यामुळेच शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी अ‍ॅन्टी करप्शनला (Anti Corruption Bureau Maharashtra) ‘त्या’ सर्वांची उघड चौकशी व्हावी म्हणून पत्र दिल्याची माहिती आता समोर आली आहे. (Corruption In Maharashtra Education Department)

शिक्षण आयुक्त मांढरे यांच्याकडून जवळपास राज्यातील सर्वच परिक्षेत्रातील अ‍ॅन्टी करप्शनच्या पोलिस अधीक्षकांना
यासंदर्भात यापुर्वीच पत्र गेलेली आहेत. दरम्यान, यासंदर्भात पोलीसनामा ऑनलाइनने अ‍ॅन्टी करप्शनच्या पुणे
परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे (Pune ACB SP Amol Tambe) यांच्याशी संपर्क साधला असता
त्यांनी वृत्ताला दुजारोला दिला. पोलिस अधीक्षक तांबे म्हणाले की, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांचे पत्र
आमच्याकडे देखील यापुर्वीच आले आहे. अ‍ॅन्टी करप्शनचे ट्रॅप अथवा छापे पडलेल्या संबंधित शिक्षक,
शिक्षण अधिकारी यांची उघड चौकशी व्हावी असे पत्रात नमुद केलेले आहे.
पण, अ‍ॅन्टी करप्शनच्या कार्यपध्दतीनुसार एसीबी ट्रॅप अथवा छापा पडल्यानंतर संबंधिताची उघड चौकशी सुरू होते.
त्यामुळे आयुक्त मांढरे यांचे पत्र येण्यापुर्वीच आम्ही पुणे, सातारा (Satara), सांगली (Sangli), सोलापूर (Solapur) आणि कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील लाचखोर शिक्षक, शिक्षण अधिकार्‍यांच्या उघड चौकशा सुरू झालेल्या
आहेत असे पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले.

राज्यातील अ‍ॅन्टी करप्शनच्या सर्वच परिक्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या चौकशी सुरू आहेत असे त्यावरून स्पष्ट झालेले आहे.
एकंदरीतच भ्रष्टाचारी अधिकार्‍यांचे आता चांगलेच धाबे दणाणले आहेत.
त्यातच स्वतः शिक्षण आयुक्तांनी अशा प्रकारचे पत्र अ‍ॅन्टी करप्शन विभागाला दिल्यामुळे राज्यातील शिक्षण
क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

Web Title : Corruption In Maharashtra Education Department | Education Commissioner Suraj Mandhare’s letter to anti-corruption for open investigation of ‘those’ teachers, education officials in the state, huge excitement in the education sector

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nagesh Bhonsle | चिडियाखाना : अभिनेते नागेश भोसले बनले मुंबईचे महापौर

Naresh Mhaske | ‘संजय राऊत म्हणजे सिल्व्हर ओकच्या दारातील…’, नरेश म्हस्केंचा राऊतांवर घणाघात

Majhi Vasundhara Abhiyan 3.0 Awards | जागतिक पर्यावरण दिनी माझी वसुंधऱा 3.0 पुरस्कारांचे वितरण; सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी गटात पुण्याचे कलेक्टर डॉ. राजेश देशमुख

Total
0
Shares
Related Posts
Amravati Assembly Constituency | mla sulbha khodke suspended from congress for six years for doing anti party activities she likely to join ajit pawar ncp

Amravati Assembly Constituency | पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन; आता सुलभा खोडके अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढविण्याच्या तयारीत

Sayaji Shinde On Sushma Andhare | sushma andhare criticism on ncp ajit pawar entry and now the sayaji shinde counterattack

Sayaji Shinde On Sushma Andhare | ‘सयाजी शिंदेंनी गुलीगत धोका दिला’, राष्ट्रवादीच्या प्रवेशावर सुषमा अंधारेंचा निशाणा; शिंदेंचा पलटवार; म्हणाले – ‘मी सुषमा अंधारे यांना विचारून निर्णय घेत नाही’