राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामात ५० लाखांचा भ्रष्टाचार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नगर तालुक्यातील नांदगाव मध्ये २०१२ – १३ च्या राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामामध्ये ५० लाखांचा भ्रष्टाचार झाल्याची बाब उघडकीस आली आहे. वारंवार निवेदन देऊनही कुठलाही अधिकारी नांदगाव येथे पहाणी करण्यास आला नाही. कुठल्याही प्रकारची चोकशी झाली नाही. ज्यांनी बोगस काम केले, त्या संबंधीत अधिकार्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई देखील झाली नाही. त्यामुळे आज जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणास सुरुवात झाली आहे.

नगर तालुक्यातील नांदगाव मध्ये २०१२ – १३ च्या राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामामध्ये ५० लाखांचा भ्रष्टाचार झाल्याची बाब उघडकीस आली आहे. शासनाने भरीव निधी देऊन देखील गावातले पाईप लाईनचे कामसुद्धा गेल्या अनेक दिवसापासून रखडल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. केलेली पाईपलाईन देखील हलक्या दर्जाची असून नागरिकांना अजून ही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गावातील विहिरीदेखील कोरड्या पडल्या आहेत. या योजनेमध्ये अधिकारी, ठेकेदार आणि ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायतीमधून शासनाचा निधी स्वतःच्या पदरी बाळगला आहे. त्यामुळे कामाची गुणवत्ता देखील कमी प्रतीची आहे. यासंदर्भात कामाची चौकशी करून भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी देखील नांदगाव शिंगवे येथील नागरिकांनी काही दिवसांपूर्वी नगरच्या जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद यांच्याकडे वेळोवेळी निवेदन देऊनही, यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. यामुळे ग्रामस्थांनी अहमदनगर जिल्हा परिषद समोर 24 जुलैपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

जिल्हा परिषदेसमोर सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब वरपे,जिल्हाध्यक्ष क्रांतिवीर लहुजी सेना रोहिदास उमाप,शरीफभाई पठाण, शिवाजी हरिश्चंद्रे,महेश जाधव,हरीश शेळके आदी उपोषणास बसलेले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –