धुळे : शोष खड्ड्याची अंत्ययात्रा काढून अनोखे आंदोलन ; रोहयोत लाखोंचा अपहार

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – तालुक्यातील कापडणे गावात सोमवारी ग्रामस्थांनी अनोखे आंदोलन केले. यामुळे गावातील अन्य ग्रामस्थ आश्चर्य चकीत झाले. सविस्तर माहिती की, रोजगार हमी योजनेअंतर्गत सन २०१५-१६ या वर्षाकरीता मंजुर झालेले ७०० शोष खड्यांपैकी एकही शोषखड्डा गावात कोणाच्याही घरासमोर तयार झाला नाही, गावातील १५ अंगणवाडी, २ जि. प. शाळा, ४ माध्यमिक शाळा इ. ठिकाणी पण शोषखड्डे दाखविण्यात येवून अनुदान हडप केल्याचे नमूद केले आहे. परंतु सर्व पैसे परस्पर काढून १४ लाख रुपयांचा अपहार करण्यात आला आहे.

याविषयी ग्रामपंचायत कापडणे दप्तरी आलेली कागदपत्रे गहाळ करण्यात आली आहेत. सर्व प्रकरणाची कसून चौकशी करुन संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा तक्रारदार ललीत मधुकर पाटील यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिला. त्याचा काही एक फायदा न झाल्याने गावातील ग्रामस्थांच्या मदतीने सायंकाळी गावातून खड्ड्याची प्रतिक्रात्मकरित्या अंतयाञा काढुन निषेध नोंदविण्यात आला. यावेळी ह्या अंतयाञेत मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. न्याय मिळावा यासाठी हे अनोखे आंदोलन करण्यात आले.

यावेळी पंचायत समिती सदस्य शरद माळी, ग्रामपंचायत विद्यमान भटू पाटील, भाजपा शाखा अध्यक्ष सतीश पाटील, ग्रामपंचायत सदस्य भैय्या मोरे, ग्रामपंचायत सदस्य अमोल पाटील, योगेश पाटील, प्रकाश माळी, ज्ञानेश्वर माळी, उज्वल बोरसे, रमेश खलाणे, राजेंद्र माळी, संदीप सैंदाणे, युवा मोर्चा अध्यक्ष संतोष पाटील, बंटी पाटील, विठोबा माळी, चंद्रशेखर माळी, भटू वाणी आदी हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. संपूर्ण कापडणे गावातून शोष खड्डे चा १४ लाखांचा अपहार झाल्यामुळे ग्रामस्थांचा नाराजीचा सूर यातून दिसून आला.  प्रत्येकी दोन हजार रुपये खड्याप्रमाणे शोष खड्डा प्रमाणे असा एकूण १४ लाखांचा अपहार झाल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –