बारामतीमध्ये भ्रष्टाचार फोफावतोय ? सरकारी अधिकारी अन् कर्मचार्‍यांकडून राजरोसपणे होतेय पैशांची मागणी

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – राजकीय वर्तुळात आपल्या रोखठोक वक्तव्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार ( Ajit Pawar) हे ओळखले जातात. इतकंच नाही तर ते प्रशासकीय यंत्रणेवर वचक असलेले मंत्री म्हणूनही परिचित आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ( Ajit Pawar ) यांच्या बारामती ( Baramati ) तच भ्रष्टाचार फोफावला आहे. आणि तोही शासकीय कार्यालयातच. बारामती (Baramati ) च्या दुय्यम निबंधक कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांकडून जमीन, सदनिका खरेदी-विक्रीपासून भाडेकरार, जुने दस्त मिळविणे या असंख्य कामांकरिता दररोज लाखो रुपयांची लूट होत आहे. ही लूट उघड-उघड दुय्यम निबंधक कार्यालयांत सुरु आहे.

या प्रकरणाने सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात डोकेदुखी वाढली आहे.
तर हा प्रत्यक्ष अनुभव आलेल्या एका व्यक्तीने दस्त नोंदणी करण्यासाठी दुय्यम निबंधक १ च्या कार्यालयातील अधिकाऱ्यास दीड हजारांची लाच दिल्यास भाग पडले असल्याचे सांगितले.
त्यातही कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने लाचखोर अधिकारी चांगलेच फोफावले आहेत. उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीतच शासकीय कार्यालयात भ्रष्टाचाराचे पेव फुटले आहेत.
मात्र, मोठ्या जोखमीच्या आपल्या आर्थिक व्यवहारामध्ये काही त्रुटी काढून आपल्याला त्रास दिला जाईल, या भीतीपोटी कोणीही तक्रार करत नाही.
याचाच फायदा लाचखोर उचलत आहे.
आपली नोंदणी सुरक्षित व्हावी या भीतीपोटी सर्वसामान्य मंडळी लाच देण्यासाठी प्रवृत्त होतात.
मात्र, आता लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जरब बसविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

बारामती तहसील कार्यालयात २ दुय्यम निबंधक कार्यालयांमार्फत खरेदी-विक्रीचे व्यवहार पार पाडले जातात. या व्यवहारांमधून शासनाला दररोज कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो.
त्याचबरोबर येथे कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्याचेही खिसे चांगलेच भरले जात आहेत.
कार्यालयांबाहेर कार्यरत असलेले एजंट तसेच वकिलांकडून ते पैसे घेतात.
१ च्या दुय्यम निबंधक कार्यालयात आता पक्षकाराचे नाव कोणता दस्त केला.
त्याचे एका चिठ्ठीवर नाव लिहून त्यात लाच ठेऊन अधिकाऱ्याच्या हातात देण्याचा प्रकार सध्या सुरू आहे.
यावेळी अधिकारी ती चिठ्ठी आपल्या ड्रायव्हरच्या कप्प्यात ठेवत आहे.
मुद्रांक विभागाच्या अखत्यारीतील दुय्यम निबंधक कार्यालयातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी ऑनलाइन दस्त नोंदणी प्रक्रिया सुरू केली.
पण या प्रक्रियेलाही दाद न देता भ्रष्टाचाराची गंगा वाहतच राहिली. भ्रष्टाचार रोखण्यासाठी व फसवणूक टाळण्यासाठी यापुढे प्रत्येक दस्त नोंदणीसाठी आधार कार्डची सक्ती करण्यात आली आहे.
पण दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी व एजंटांच्या भ्रष्ट साखळीद्वारे ‘आधार कार्डला निराधार ठरवून दस्त नोंदणीची दुकानदारी सुरूच राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर दुय्यम निबंधक अधिकारी स्वतःहून पैशांची मागणी करत आहेत.

बारामती प्रशासकीय भवनात जवळपास सर्वच विभागांमध्ये शासकीय योजना तसेच प्रकरणांच्या मंजुरीसह इतर विभागांतील किरकोळ कामांसाठी लाच घेण्याचे प्रकार सुरू आहेत.
बारामतीच्या दुय्यम निबंधक कार्यालयात अधिकाऱ्याकडून प्रत्येक दस्ताला पैशांची मागणी केली जात आहे. पैशांशिवाय अधिकाऱ्यासह कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे हातच चालत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

READ ALSO THIS :

तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क !