मनरेगात कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार : विजय वडेट्टीवार यांचा आरोप

गडचिरोली : पोलीसनामा

गडचिरोली जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. कुशल आणि अकुशल कामावर ज्या प्रमाणात खर्च होणे आवश्यक होते, त्या प्रमाणात खर्च झालेला नाही. अकुशल लोकांच्या रोजगारावर अधिक खर्च न करता तो साहित्य खरेदीत अधिक करण्यात आला आणि बनावट देयके सादर करून लाखो रुपयांची हेराफेरी करण्यात आली, असा आरोप त्यांनी केला. वडेट्टीवार यांनी या भ्रष्टाचाराची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली होती.

वडेट्टीवार म्हणाले, केंद्र सरकारच्या कायद्यानुसार मनरेगामध्ये कुशल कामासाठी ४९ टक्के आणि अकुशल कामासाठी ५१ टक्के निधी खर्च करणे बंधनकारक आहे. मात्र, गडचिरोली जिल्ह्यात ६२ टक्के कुशल कामासाठी आणि ३८ टक्के रक्कम अकुशल कामासाठी वापरली. अशा प्रकारे निधी वळवणे गुन्हा आहे.  या जिल्ह्यासाठी या योजनेत १३९ कोटी रुपये मंजूर झाले. यातील ३७ कोटी रुपयांची साहित्य विना ई-निविदा काढता खरेदी केली. सिमेंट खरेदीसाठी तर ११.५४ कोटी रुपये खर्च करण्यात आले आणि या सर्व साहित्य खरेदीची देयके एका कृषी केंद्राची जोडण्यात आली.

[amazon_link asins=’B078YQZC6D,B07FY9CN1Q’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e9e5209d-b7d3-11e8-a59d-973cbed40529′]

कुरखेडा येथे गेल्या आर्थिक वर्षांत कुशल कामाकरिता २ कोटी ३२ लाख रुपये खर्च करण्यात आले. मजुरांवर (अकुशल) १ कोटी ११ लाख रुपये खर्च झाले. या योजनेचा मूळ उद्देश्य ग्रामीण भागातील लोकांना रोजगार देणे आहे, परंतु कामगारांवर अधिकाधिक खर्च न करता साहित्य खरेदीत अधिक खर्च केला जात आहे. राज्य सरकारने राम बोंडे यांना या समितीवर नियुक्त केले आहे. ते भाजपशी संबंधित आहेत. तेच या आर्थिक अनियमिततेला प्रोत्साहन देत आहेत. शिवाय त्यांना मनरेगाचा ऑडिट करण्याचा पाच वर्षांचा अनुभव आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

विजय मल्ल्या प्रकरणावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, विजय मल्ल्या काँग्रेसच्या सांगण्यावरून केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्यावर आरोप करत असल्याचे विधान राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले असून ते तथ्यहीन आहे. देशात दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. सर्व सुरक्षा, तपास यंत्रणा त्यांच्या हाती आहेत. अशा स्थितीत सापडलेली व्यक्ती सरकारविरोधात बोलू शकेल, असे वाटत नाही. उठसूठ काँग्रेसला जबाबदार धरू नये. विजय मल्याने देशाबाहेर जाण्यापूर्वी भाजपच्या बँक खात्यात पक्षनिधी म्हणून किती कोटी रुपये टाकले, याचाही खुलासा सरकारने करावा, असे आव्हान वडेट्टीवार यांनी दिले.

नोटबंदी एवढा बेजबाबदार निर्णय जगातील कोणत्याही पंतप्रधानाने घेतला नाही – डाॅ.भालचंद्र मुणगेकर