Corruption Perceptions Index (CPI) | भारतात किती आहे भ्रष्टाचार ? ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने जारी केला पाकिस्तानसह अनेक देशांचा डेटा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – करप्शन परसेप्शन इंडेक्स Corruption Perceptions Index (CPI) 2021 मध्ये भारत 180 देशांमध्ये 85 व्या स्थानावर आहे. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने जारी केलेल्या अहवालानुसार भारताच्या क्रमवारीत गेल्या वेळेच्या तुलनेत एका स्थानाने सुधारणा झाली आहे. मात्र, अहवालात भारताच्या लोकशाही व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. Corruption Perceptions Index (CPI)

 

तज्ञ आणि व्यावसायिकांच्या मते, सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या कथित पातळीच्या आधारावर 180 देश आणि प्रदेशांच्या क्रमवारीची यादी तयार केली जाते. हे रँकिंग 0 ते 100 गुणांचा स्केल वापरून ठरवले जाते. शून्य गुण मिळालेला देश हा सर्वाधिक भ्रष्ट तर 100 गुण मिळवणारा देश भ्रष्टाचाराच्या दृष्टिकोनातून अत्यंत स्वच्छ मानला जातो.

 

या यादीत भारत 40 गुणांसह 85 व्या क्रमांकावर आहे.
चीन (45), इंडोनेशिया (38), पाकिस्तान (28) आणि बांगलादेश (26) गुणांसह यादीत विविध ठिकाणी आहेत.
या यादीत पाकिस्तान 140 व्या क्रमांकावर आहे. डेन्मार्क, फिनलंड, न्यूझीलंड आणि नॉर्वे या देशांनी या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.

 

Web Title :- Corruption Perceptions Index (CPI) | india ranked 85th out of 180 countries in the corruption perceptions index cpi 2021

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा