Cosmo Films Shares | गुंतवणूकदारांची चांदी ! ‘हा’ शेअर अवघ्या 5 रुपयांवरून थेट 1800 रुपयांवर पोहोचला

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Cosmo Films Shares | अनेकजण एक व्यवसाय म्हणून शेअर मार्केटकडे (Stock Market) वळले आहेत. सुरक्षित गुंतवणूक आणि चांगला परतावा यासाठी गुंतवणूकदार (Investors) शेअर शोधत असतात. दरम्यान, अशाच एक शेअर बाजारात एका कंपनीने जबरदस्त परतावा दिला आहे. या कंपनीचा शेअर पाच रुपयांवरून थेट 1800 रुपयांवर गेला आहे. कॉस्मो फिल्म्स (Cosmo Films Shares) असं या कंपनीचं नाव आहे. (Share Market Marathi News)

 

कॉस्मो फिल्म्स आपल्या गुंतवणूकदारांना 1:2 या रेशोमध्ये बोनस शेअर देणार आहे. कंपनीच्या शेअरने मागील 1 वर्षामध्ये 170 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला जात आहे. तसेच, यंदा आतापर्यंत कंपनीच्या शेअर्सनी 34 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. (Cosmo Films Shares)

 

कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने (Board of Directors) 1:2 च्या रेशोमध्ये बोनस शेअर इश्यू करण्यास मंजुरी दिली आहे. अर्थात ज्या गुंतवणूकदारांकडे कंपनीचे दोन शेअर असतील, त्यांना 1 बोनस शेअर मिळणार आहे. कॉस्मो फिल्म्सने (Cosmo Films Shares) अजुन बोनस शेअरच्या रेकॉर्ड डेटची घोषणा केलेली नाहीये. कॉस्मो फिल्म्स BOPP फिल्म मॅन्युफॅक्चरर, सप्लायर आणि प्रोड्यूसर आहे. या कंपनीचा शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर आज (मंगळवारी) 1852 रुपयांवर पोहोचला होता. असं कंपनीने सांगितलं आहे.

5 रुपयांवरून थेट 1800 रुपयांवर –
हा शेअर 8 जानेवारी 1999 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange) मध्ये 5 रुपयांवर होता.
तसेच, 10 मे 2022 रोजी हा शेअर 1852 रुपयांवर आहे.
समजा एखाद्या गुंतवणूकदाराने 8 जानेवारी 1999 रोजी कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती, तर आता त्याचे 3.7 कोटी रुपये झाले असते.
कॉस्मो फिल्म्सच्या शेअर्स कडून मागील सहा महिन्यामध्ये गुंतवणूकदारांना तब्बल 19 टक्कांचा परतावा देण्यात आला आहे.
त्याचबरोबर मागील 5 वर्षामध्ये कंपनीच्या शेअर्स कडून 321 टक्के इतका परतावा देण्यात आला आहे.

 

Web Title :- Cosmo Films Shares | lottery for investors cosmo films shares went from just rs 5 to rs 1800 company announced bonus share

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा