कॉसमॉस बॅक फसवणूक: बँकेप्रमाणेच पोलिसांकडूनही स्वतंत्र सुरक्षा ऑडिट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

देशातील क्लोन केलेल्या रुपे कार्ड मार्फत तर परदेशातून व्हिसा मार्फत विविध खात्यामधून सुमारे ९४ कोटी ४२ लाख रुपयांवर डल्ला मारुन कॉसमॉस बँकेची फसवणूक करण्यात आली आहे. कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरप्रमाणे प्रॉक्सी सर्व्हर उभारुन केलेल्या सायबर दरोडा प्रकरणात बँकेकडून सुरक्षा ऑडिट केले जात आहेत. बँकेप्रमाणेच पोलिसांकडूनही स्वतंत्र सुरक्षा ऑडिट करण्यात येणार असल्याचे  आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त ज्योतिप्रिया सिंह यांनी सांगितले.

[amazon_link asins=’B07DYFX2C8,B011IRCV8C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d004d46a-a534-11e8-908a-a1747f426928′]

कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरप्रमाणे प्रॉक्सी सर्व्हर उभारुन परदेशातून व्हिसा तर देशातील अनेक शहरांमधून क्लोन केलेल्या रुपे कार्ड मार्फत विविध खात्यांमधून पंधरा हजारांहून अधिक व्यवहारांद्वारे रक्कम काढण्यात आली आहे. त्यात रुपे कार्डमार्फत देशातील ४१ शहरांमधून ७१ वेगवेगळ्या बँकांच्या एटीएममधून अडीच कोटी रुपये काढले गेले आहेत.

देशातील ज्या एटीएममधून पैसे काढण्यात आले त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्याचे काम सुरु असून त्यापैकी निम्म्या एटीएमचे फुटेज पोलिसांना मिळाले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.  महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, कोल्हापूर, ठाणे आणि नवी मुंबई येथील एटीएममधून पैसे काढण्याचे समोर आले आहे. सर्वाधिक पैसे कोल्हापूर व मुंबई येथून काढण्यात आले आहेत. परदेशातील कोणत्या देशातून व कोणत्या बँकेच्या एटीएममधील पैसे काढण्यात आले, याची माहिती व्हिसा कंपनीकडून मागविण्यात आली असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.