कॉसमॉस बँक दरोडा प्रकरण : पालघर, भिवंडीतुन आणखी दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

कॉसमॉस बँकेचा सर्व्हर हॅक करुन ९४ कोटी पळविल्याप्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या सहावर पोहचली आहे. पुणे पोलिसांच्या विशेष पथकाने पालघर व भिवंडीतुन दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून टोळीतील इतरांची माहिती मिळाली असल्याचे सांगण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २४ सप्टेबंर पर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.
[amazon_link asins=’B074GY4DSL,B07CRGDR8L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’774186a0-b7fa-11e8-9f34-c92581759d21′]

नरेश महाराणा (पालघर) व महंमद सय्यद (भिवंडी) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.

मागील महिन्यात कॉसमॉस बँकेच्या पुण्यातील मुख्यालयातील सर्व्हर हॅक करून सायबर चोरट्यांनी १५ हजारांहून अधिक व्यवहारांद्वारे तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपयांचा सायबर दरोडा टाकला होता. या प्रकरणात पुणे पोलिसांनी चार जणांना अटक करुन त्यांच्याकडून काही रक्कम जप्त केली आहे.

गणेशखिंड रोडवरील कॉसमॉस बॅंकेच्या मुख्य कार्यालय येथे एटीएम स्विच (सर्व्हर) ११ ऑगस्टला दुपारी ३ ते १० दरम्यान हॅक करण्यात आले. हॅकरने व्हिसा आणि रूपे डेबिट कार्डधारकांची माहिती चोरली होती. व्हिसा कार्डाच्या बारा हजार व्यवहारांमध्ये त्यांनी ७८ कोटी रूपये ट्रान्सफर केले. त्याचप्रमाणे रूपे कार्ड धारकांच्या २ हजार ८४९ व्यवहारांमध्ये २ कोटी ५ लाख रुपये भारतात ट्रान्सफर करण्यात आले. हॅकर्सने पुन्हा १३ ऑगस्टच्या सकाळी साडेअकरा वाजता १३ कोटी ९२ लाख रुपये हाँगकाँग बँकेतील एएलएम ट्रेडिंग लिमिटेड खात्यात जमा केले गेले.
[amazon_link asins=’B06XKS4WLT,B0751C1WGF’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7cf024f8-b7fa-11e8-b9e8-a9c5040f171c’]

मंगळवारी पुणे पोलिसांनी फहिम मेहफुज शेख (वय-27) आणि फहिम अजीम खान (वय-30) या दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडून ३ लाख ५५ हजार रुपये जप्त करण्यात आले होते. या दोघांनी त्यांच्या पाच साथिदारांच्या मदतीने कोल्हापूरमधील एटीएम मधून ८९ लाख ४७ हजार ५०० रुपये काढल्याचे तपासात समोर आले आहे. हे पैसे काढण्यासाठी त्यांनी ९५ क्लोन डेबीट कार्ड वापरले होते.

गोव्यात नेतृत्वबदलाच्या हालचालींना वेग; मनोहर पर्रीकरांची तब्येत खालावली