Cosmos Bank Cyber Attack Case – Pune Crime | पुणे क्राईम : कॉसमॉस बँक सायबर हल्ल्यातील 11 जणांना शिक्षा ! मुख्य सुत्रधार अजूनही मोकाट; कोल्हापूर, मुंबई, अजमेर, इंदौर येथील एटीएममधून काढले होते 94 कोटी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Cosmos Bank Cyber Attack Case – Pune Crime | काँसमॉस बँकेच्या (Cosmos Bank) गणेशखिंड रोडवरील (Ganeshkhind Road) मुख्यालयातील ए टी एम स्वीच (सर्व्हर) वर सायबर हल्ला करुन कॉसमॉस बँकेची ९४ कोटी ४२ लाख रुपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी ११ जणांना शिक्षा सुनावली. बँकेच्या एटीएममध्ये (ATM Center) जाऊन क्लोन केलेल्या डेबिड कार्डद्वारे (Debit Card Cloning) प्रत्यक्ष पैसे काढणारे भारतील हे आरोपी आहेत. (Cosmos Bank Cyber Attack Case – Pune Crime)

 

देशातील सर्वात मोठ्या सायबर हल्ल्यातील मुख्य सुत्रधार, प्रत्यक्ष सायबर हल्ला करणारे, बँकेच्या सर्व्हरला बायपास करुन स्वतंत्र सर्व्हरद्वारे व्यवहार करणारे व बँकच्या ग्राहकाचा डाटा चोरणारे, त्याद्वारे क्लोन व्हिसा व रुपे डेबिड कार्ड (RuPay Debit Card) तयार करुन ते या सर्व आरोपीपर्यंत पोहचविणारे तसेच जगभरातील २८ देशातील वेगवेगळ्या एटीएममधून पैसे काढणारे आरोपी हे अजूनही नामानिराळे आहेत. (Cosmos Bank Cyber Attack Case – Pune Crime)

फहिम मेहफुज शेख (रा. भिवंडी), फहिम अझीम खान (रा. सिल्लोड, औरंगाबाद), शेख मोहम्मद अब्दुल जब्बार (रा. सिल्लोड, औरंगाबाद), महेश साहेबराव राठोड (रा. भोकर, जि. नांदेड), नरेश लक्ष्मीनारायण महाराणा (रा. विरार), मोहम्मद सईद ईक्बाल हुसेन जाफरी ऊर्फ अली (रा. भिवंडी), युस्टेस अगस्टीन वाझ (रा. जोगेश्वरी, मुंबई), अब्दुल्ला अफसरअली शेख (रा. मिरा रोड, इस्ट, ठाणे), बशीर अहमद अब्दुल अझीज शेख (रा. भायखळा, मुंबई), सलमान मोहम्मद नईम (रा. मुंब्रा, ठाणे), फिरोज यासीन शेख (रा. काळा चौकी, मुंबई) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.

 

कॉसमॉस बँकच्या गणेश खिंड रोडवरील मुख्यालयात असलेल्या सर्व्हरवर सायबर हल्ला करुन सायबर चोरट्यांनी ११ ऑगस्ट २०१८ रोजी बँकेच्या काही व्हिसा व रुपे डेबीट कार्डधारकांची माहिती चोरुन, क्लोन व्हिसा डेबिट कार्डद्वारे प्रत्यक्ष ए टी एम सेंटरवर जाऊन क्लोन कार्डद्वारे भारताबाहेर ७८ कोटी रुपये व भारतामध्ये क्लोन रुपे डेबिट कार्डद्वारे २ हजार ८४९ व्यवहार करुन २ कोटी ५० लाख रुपयांची फसवणुक केली. त्यानंतर १३ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजता स्विफ्ट ट्रान्झेक्शन इनिशिएट करुन हँगसेंग बँक हाँगकाँग या बँकेच्या ए एल एम ट्रेडिंग, हाँगकाँग यांच्या बँक खात्यावर १३ कोटी ९२ लाख रुपये जमा करुन ते काढून घेतले गेले होते.

या गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस ठाण्याचे (Cyber Police Station Pune) वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे (Sr PI Jayram Paygude) यांच्याकडे देण्यात आला होता. एन पी सी आय,. व्हिसा व बँकेकडून प्राप्त माहितीचे तांत्रिक विश्लेषण केले असताना जास्त रक्कमा कोल्हापूर (Kolhapur), मुंबई (Mumbai), अजमेर (Ajmer), व इंदौर (Indore) या शहरातून काढल्याचे आढळून आले. या माहितीचे विश्लेषण करुन सायबर पोलिसांनी या ठिकाणाहून २०१८ व २०१९ मध्ये एकूण १८ आरोपींना अटक केली. तपासादरम्यान प्राप्त झालेले सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक पुराव्या आधारे त्यांचे विरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले. त्यांच्या पैकी एकाचा मृत्यु झाला असून १७ आरोपी अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत.

 

आरोपींपैकी पहिल्या ७ जणांना कलम ४२० अन्वये ४ वर्षे साधी कैद, २०० रुपये दंड तसेच ४६७, ४६८, ४७१ अन्वये ४ वर्षे ७ महिने साधी कैद, २०० रुपये दंड, कलम ४६९ अन्वये ३ वर्ष साधी कैद व १०० रुपये दंड, कलम १२० ब अन्वये ६ महिने कारावास, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ सी अन्वये ३ वर्ष साधी कैद, १०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. त्याचप्रमाणे ८ व ९ आरोपींना ४ वर्ष साधी कैद व इतर शिक्षा तसेच १० व ११ आरोपींना ४ वर्ष साधी कैद व २०० रुपये व इतर शिक्षा सुनावण्यात आली आहे़.

.

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे (Retired IPS Pradeep Deshpande),
पोलीस उपायुक्त ज्योतिप्रिया सिंह (IPS Jyoti Priya Singh), पोलीस उपायुक्त संभाजी कदम (DCP Sambhaji Kadam),
सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार (ACP Shivaji Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी केला.
लेखनिक म्हणून हवालदार अजित कुर्‍र्हे, पोलीस अंमलदार योगेश वाव्हळ यांनी काम पाहिले.
सहायक निरीक्षक सागर पानमंद (API Sagar Panmand), हवालदार अस्लम अत्तार,
संतोष जाधव यांनी तांत्रिक पुरावा गोळा करण्यात मदत केली. विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह (IPS Brijesh Singh),
भारती राष्ट्रीय भुगतान निगम, न्यायवैद्यक प्रयोगशाळा, गणेशखिंड आणि हाथवे इंटरनेट यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.
या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. बोधिनी (Adv Bodhini)
यांनी व पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक रेणुसे (PSI Renuse) यांनी काम पाहिले.

 

Web Title :- Cosmos Bank Cyber ​​Attack Case – Pune Crime | 11 people punished in Cosmos Bank cyber attack! Main coordinator still free; 94 crore was withdrawn from ATMs in Kolhapur, Mumbai, Ajmer, Indore

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Dagdusheth Ganpati | दगडूशेठ गणपती : श्री गणेश व देवी शारदा यांचा शारदेश मंगलम् विवाह सोहळा थाटात

PM Kisan Samman Nidhi | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी : 1 कोटी 10 लाख शेतकऱ्यांना लाभ – कृषि आयुक्त सुनील चव्हाण

Maharashtra Tourism – MTDC | पर्यटन महामंडळात फेलोशिपची तरुणांना संधी; 15 मेपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन