कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरणी आणखी दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा आॅनलाइन

 

राज्यातीलच नव्हे तर देशातील बँकींग क्षेत्राला हादरविणाऱ्या कॉसमॉस बँक सायबर हल्लाप्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. शेख मोहम्मत अब्दुल जब्बार (२८, रा. आयेशा मस्जिदजवळ) मिर्झा कॉलनी औरंगाबाद) आणि महेश साहेबराव राठोड (२२, रा. धावरीतांडा, नांदेड) अशी या दोघांची नावे असून त्यांना सायबर क्राईम सेलच्या गुन्हे शाखाने औरंगाबाद आणि नांदेड येथून ताब्यात घेतले.

[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5d6cb5aa-b767-11e8-a461-7d38de1e3109′]

अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. के. खराडे यांनी त्यांना १८ सप्टेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अटक आरोपींनी कट करून हा गुन्हा केला आहे. बँकेचे सर्व्हर हॅक होणार असल्याची माहिती मिळाल्याने वेगवेगळ्या भागातील आरोपी कोल्हापूर येथे आले होेते. त्यांनी पैसे काढण्यासाठी ९५ क्लोन एटीएम कार्डचा वापर केला आहे. जब्बार आणि रोठोड यांनी किती रक्कम काढली याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. तसेच यापुर्वी अटक आरोपींनी दिलेल्या माहितीवरून जब्बार आणि राठोड यांना अटक करण्यात आली आहे.

औरंगाबाद : पोलीस आयुक्तालयातील ज्युनिअर क्लार्क एसीबीच्या जाळ्यात

कॉसमॉस बँकेच्या मुख्य सर्व्हर सायबर हल्ला करून ९४ कोटी रुपये लांबविण्यात आले होते. पोलिसांनी मुंबई, इंदोर, कोल्हापूर येथून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपींची छायाचित्रे तयार केली होती. मोबाईलची माहिती आणि आरोपींच्या फोटोंवरुन ते भिवंडी, औरंगाबाद, हैदराबाद, गोवा आणि विरार येथील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. या माहितीवरुन केलेल्या तपासात अटक केलेल्या आरोपींनी पाच साथीदारांच्या मदतीने पैसे काढल्याचे स्पष्ट झाले आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी ३ लाख ५५ हजार रुपये जप्त केले आहेत.

कार्डक्लोनिंगद्वारे ६४ जणांवर आॅनलाईन दरोडा 

[amazon_link asins=’B07B4S1GLV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’65ffd6ea-b767-11e8-b84e-6d2cb8a375a3′]

११ ते १३ ऑगस्ट दरम्यान कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करून ९४ कोटी ४२ लाख रुपये लुटल्याचे उघडकीस आले होते. यातील अडीच कोटी रुपयांची रक्कम भारतातील विविध एटीएम केंद्रातून काढण्यात आली होती. यात ४१३ बनावट डेबिट कार्डच्या माध्यमातून २ हजार ८४९ व्यवहार करण्यात आले आहेत. तर, १२ हजार व्यवहार व्हिसा कार्डद्वारे झाले. त्यातून ७८ कोटी आणि स्विफ्ट व्यवहारातून १३ कोटी ९२ लाख रुपये बँकेतून गेले आहेत. या प्रकरणी सुहास सुभाष गोखले (वय ५३, रा. कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींसह आणखी पाच जणांविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या सेवेत ‘दबंग’ लेडी बाऊन्सर

आरोपींनी बनावट कार्ड कोठे तयार केली, त्यांना साहित्य कोणी पुरविले, आरोपींनी कॉसमॉस बँकेचा डाटा कसा मिळविला, बँकेचे सव्र्हर हॅक होणार याची माहिती कशी मिळाली, संबंधित गुन्हा आंतरराष्ट्रीयय स्वरुपाचा असल्याने याचा शोध घेण्यासाठी १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सायबर क्राईम विभागाच्या गुन्हे शाखेने न्यायालयात केली होती. न्यायालयाने ती मान्य करून अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना १८ सप्टेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.