सायबर दरोड्यानंतर तीन आठवड्यांनी कॉसमॉस बँकेची ई-बँकिंग सेवा सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

कॉसमॉस बँकेवर झालेल्या सायबर दरोड्यात तब्बल ९४ कोटी रुपये गायब झाले होते. या घटनेने देशभरात खळबळ उडाली होती. या दरोड्याने हादरलेल्या कॉसमॉस सहकारी बँकेची इंटरनेट बँकिंग सेवा अखेर तीन आठवड्यांनी सुरू झाली आहे. या सेवेचा वापर करण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने खातेदारांनी त्यांचे युजरनेम व पासवर्ड बदलावेत, असे आवाहन बँकेने केले आहे. बँकेची एटीएम सेवा अजूनही कार्यान्वित झालेली नसून, त्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

[amazon_link asins=’B0756Z43QS,B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b5bb9f27-b250-11e8-a910-5b1f111943e9′]

कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयातील सव्‍‌र्हरवर हॅकरने हल्ला चढवत रुपे डेबिट कार्ड आणि व्हिसा कार्डधारकांची गोपनीय माहिती चोरून ९४ कोटी ४२ लाख रुपयांची रक्कम काढल्याची घटना १४ ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती. यामुळे बँकिंग क्षेत्र हादरले होते. ही घटना घडल्याचे समजल्याबरोबर पुढील धोका टाळण्यासाठी पोलीस व अन्य यंत्रणांच्या सूचनांनुसार बँकेने आपली इंटरनेट बँकिंग सुविधा व एटीएम सेवा पूर्णपणे बंद केली होती. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या विशेष पथकाकडून सुरू आहे.

जाहीरात

बँकेने आपल्या सव्‍‌र्हरमध्ये आणि अन्य यंत्रणांत आवश्यक ती सुधारणा व बदल करून घेतले आहेत. त्यास पोलिसांकडून मान्यता मिळाल्यानंतर बँकेने इंटरनेट बँकिंग सुविधा सुरू केल्याचे जाहीर केले आहे. इंटरनेट बँकिंग सेवा सुरू झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून खातेदारांनी आपले युजरनेम व पासवर्ड बदलून मगच व्यवहार करावेत, असे आवाहन करणारे मेसेज बँकेने खातेदारांना पाठवले आहेत. एटीएम सेवेतील आवश्यक बदलही पूर्ण झाले आहेत. पोलिसांकडून परवानगी मिळाली, की तातडीने एटीएम सेवा सुरू केली जाईल, असे बँकेतर्फे सांगण्यात आले. एटीएम वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या अधिक आहे. तीन आठवड्यापासून कार्ड स्वाइप करता येत नसल्याने किंवा अन्य बँकांच्या एटीएममध्येही वापरता येत नसल्याने ग्राहक त्रस्त आहेत.