पुन्हा-पुन्हा ‘क्लिक’ करणं पडलं महागात, 12 कोटींच्या 28 कार झाल्या ‘बुक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टेस्ला कार जगभरात खूपच पसंत केल्या जातात आणि लोक या कारसाठी महिनोंमहिने थांबतात. तथापि, जर्मनीमध्ये एका व्यक्तीने जेव्हा ऑनलाईन 28 नवीन टेस्ला कार ऑर्डर केल्या तेव्हा कंपनीलाही धक्का बसला. वास्तविक झाले असे की जर्मनीतील एक व्यक्ती टेस्ला कंपनीची नवीन कार ऑनलाईन खरेदी करीत होता. सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर ग्राहकाने कन्फर्म पर्यायावर क्लिक केले परंतु त्याला कार खरेदीशी संबंधित कोणतीही माहिती मिळाली नाही.

म्हणूनच तो व्यक्ती काही वेळासाठी कन्फर्म पर्यायावर वारंवार क्लिक करत होता. यामुळे प्रत्येक क्लिकसह नवीन कारची ‘खरेदी’ होत राहिली. त्या व्यक्तीने 28 वेळा क्लिक केले ज्यामुळे 28 वाहने खरेदी झाली आणि खात्यातून पैसे वजा केले गेले. त्या ग्राहकाच्या मुलाने ही माहिती दिली आणि एक पोस्ट लिहिली की कशी एक तांत्रिक समस्या आपल्याला खूप महाग पडू शकते.

तांत्रिक अडचणींमुळे त्या व्यक्तीने एका कारऐवजी 28 कार विकत घेतल्या आणि त्याचे सुमारे 12 कोटी (1.4 मिलियन युरो) रुपये खात्यातून वजा झाले. त्या ग्राहकाच्या मुलाने पोस्टद्वारे सांगितले की त्याचे वडील आपली जुनी फोर्ड कुगा कार टेस्ला मॉडेल 3 मध्ये बदलण्याचा प्रयत्न करीत होते परंतु तांत्रिक अडचणीमुळे कार खरेदी करण्याचे जे शेवटचे बिल आले ते सुमारे 12 कोटी रुपये होते.