15 लाख रुपये किमतीचे तीन किलो ‘अफीम’ जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – अफीम विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या एकाला तळेगाव येथे अटक करुन त्याच्याकडून 15 लाख रुपये किमतीचे तीन किलो अफीम जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई
पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली.

राजेंद्र सुवर्णा शेखर सालीयाना (28, रा. अंधेरी ईस्ट, मुंबई. मूळ रा. उड्डपी, कर्नाटक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथक तळेगाव दाभाडे परिसरात अंमली पदार्थाच्या गैरव्यवहाराची माहिती घेत होते. पथकातील उपनिरीक्षक शरद आहेर यांना माहिती मिळाली की, तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशन जवळ एक व्यक्ती संशयितरित्या थांबल्याचे दिसले. पोलिसांनी परिसरात सापळा रचून संशयित राजेंद्र याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली आता त्याच्याजवळ असलेल्या पिशवीत 15 लाख रुपये किमतीचे तीन किलो अफीम आढळून आले. हे अफीम त्याने विक्रीसाठी आणले असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. राजेंद्र याच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, सहाय्यक निरीक्षक प्रशांत महाले, उपनिरीक्षक शरद आहेर, पोलीस कर्मचारी दिनकर भुजबळ, संतोष दिघे, शैलेश मगर, प्रसाद कलाटे, अशोक गरगोटे, प्रसाद जंगीलवाड, पांडुरंग फुंदे, दादा धस यांच्या पथकाने केली आहे.

You might also like