जाणून घ्या, ‘कॉस्टोकॉनड्रायटिस’ म्हणजे काय ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कॉस्टोकॉनड्रायटिस म्हणजे ब्रेस्टबोनला जोडलेल्या कार्टिलेजमध्ये सूज येणे होय. शेवटच्या दोन बरगड्या सोडून इतर सर्व बरगड्या ब्रेस्टबोनला कार्टिलेजने जोडलेल्या आहेत. या स्वयं-मर्यादित सूजेमुळे छातीत कळ मारते किंवा वेदना होतात, जे कॉस्टोकॉनड्रायटिसचे कॉमन लक्षण आहे, असे समजलं जातं

कॉस्टोकॉनड्रायटिस खालील नावांनीही ओळखला जातो:

कॉस्टो-स्टर्नल सिन्ड्रोम.
पॅरास्टर्नल कॉन्ड्रोडायनिया.
न्टिरियर चेस्ट व्हॉल सिन्ड्रोम.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?, हेही जाणून घेऊया.

वेदनांसह कॉस्टोकॉनड्रायटिसची महत्त्वाची चिन्हे आणि लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:

ब्रेस्टबोनच्या डाव्या बाजूवर सहसा वेदना उद्भवतात.
वेदना तीक्ष्ण आणि अस्वस्थ करणार्‍या असू शकतात.
दुखण्यासोबत रुग्णाला दबाव पडल्यासारखे वाटू लागते.
खोल श्वास घेणे, खोकला, दगदग आणि वरील शरीराची हालचाल यामुळे वेदना तीव्र होत असतात.
एकापेक्षा जास्त बरगडी प्रभावित होते.

याची ही मुख्य कारणं काय आहेत?

कॉस्टोकॉनड्रायटिस छातीच्या समोरच्या भिंतीत वेदना होण्याचे सर्वात सामान्य कारण आहे. सामान्यतः याचे कोणतेही मुलभूत कारण नसते. ज्या बरगड्या ब्रेस्टबोनला कार्टिलेजने जोडलेल्या असतात, त्या सूजतात आणि कॉस्टोकॉनड्रायटिस होतो.

काही सामान्य कारणे पुढीलप्रमाणे :

छातीवर जखम किंवा आघात होणे.

अति-व्यायाम करणे किंवा खोकल्याचा गंभीर त्रास असणे.
संधिवाताचा त्रास असणे.
क्षयरोग आणि सिफिलीस यासारखे संसर्ग ज्यामुळे बरगडीचे सांधे प्रभावित होतात.
फुफ्फुसे, स्तन किंवा थायरॉईड कॅन्सर छातीत स्थलांतरित होणे.
कॉस्टोकॉनड्रायटिस टिटेझ सिन्ड्रोमशी संबंधित आहे, ज्यामध्ये एकाच भागात वेदना होतात आणि त्या ठिकाणी सूज येते.

कॉस्टोकॉनड्रायटिसचा धोका 40 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना जास्त असतो. हा विकार पुरूषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक आढळतो.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?,हेही जाणून घेऊ

कॉस्टोकॉनड्रायटिसचे निदान वैद्यकीय इतिहास व बारगड्यांची शारीरिक तपासणी करून होते. तुमचे डॉक्टर तुम्हाला गंभीर खोकल्याचा त्रास आहे का? किंवा तुम्ही कडक शारीरिक प्रशिक्षण करता का? याबद्दल विचारपूस करतील. मुलभूत कारणे शोधण्यासाठी अ‍ॅन्टिरिअर चेस्ट एक्स-रे काढावा.

तसेच पुढील कारणे देखील तपासले जातात:

खांद्याचे सांधे किंवा छातीचे सांधे यात संधिवात.
संसर्ग किंवा निओप्लाझम यामुळे बरगडी जवळची कार्टिलेज नष्ट होणे.
फायब्रोमायल्जिया.
छातीच्या आतील भागात हर्पेस झोस्टर.

कॉस्टोकॉनड्रायटिसचे उपचार :

नाल्जेसिक्स आणि न्टी-इंफ्लेमेटरी औषधे.
त्रास गंभीर असल्यास आणि आवश्यक असल्यास लोकल अनॅस्थेटिक किंवा स्टिरॉइड इन्जेक्शन.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हलके स्ट्रेचिंग व्यायाम.
स्वतःची-काळजी घेणे
उबदार किंवा गरम कॉम्प्रेस.
कोणतेही कडक शारीरिक क्रियाकलाप किंवा तणाव टाळणे.

(टीप : आपल्या ज्ञानात अधिक भर पडावी म्हणून हि माहिती केवळ आपल्याला माहित असावी म्हणून दिली जात आहे, हे आपल्या लक्षात असू द्या. याबाबत आपण वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढील निर्णय आणि समज करून घ्यावेत. तसेच याबाबतच्या अधिक माहितीसाठी आपल्या वैद्यकीय तज्ञांशी संपर्क साधावा.)