Cough Cure | हिवाळ्यात छातीमधील कफ त्रास देतोय का? मग या घरगुती उपायांनी करा परिणामकारक उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Cough Cure | हिवाळ्यात मोसमी आजार खूप त्रासदायक ठरतात. या ऋतूमध्ये थंडीचाचा प्रभाव शरीरावर अधिक असतो, त्यामुळे खोकला आणि सर्दीची (Cough and Cold) समस्या वाढू लागते. सर्दी-खोकला यांमुळे काही वेळा कफाचा त्रासही सुरू होतो. (Cough Cure)

 

 

छातीत श्लेष्मा जमा झाल्यामुळे श्वासोच्छवासाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. जर शरीरात श्लेष्माचे प्रमाण जास्त असेल तर छातीत रक्तसंचय होण्याचा धोका वाढू शकतो.

 

 

छातीत कफ झाल्यावर त्याची लक्षणे शरीरात दिसू लागतात जसे की तीव्र खोकला, खोकल्याबरोबर घरघर, नाक वाहणे, खोकताना छातीत दुखणे, खोकताना श्लेष्मा येणे, कफ असलेल्या गंभीर प्रकरणांमध्ये रक्तस्त्राव सुद्धा होतो.

 

 

अशा परिस्थितीत जर कफाची समस्या जास्त झाली असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना दाखवा, काही आयुर्वेदिक उपायांचा अवलंब केल्यास तुम्हाला यापासून आराम मिळू शकतो. कफपासून मुक्त होण्यासाठी काही सोप्या आयुर्वेदिक उपायांचा अवलंब करू शकता. (Cough Cure)

 

 

हे आहेत उपाय

1. कच्च्या हळदीचे सेवन करा (Eat Raw Turmeric)
सर्दी-खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी कच्च्या हळदीचा वापर करा. कच्च्या हळदीचा रस एका चमच्यात काढून तोंडात टाका आणि थोडा वेळ बसा. हळदीचा रस घशात गेल्याने घशाला फायदा होईल.

 

 

2. गुळ आणि आल्याचे सेवन करा (Eat Jaggery and Ginger)
हिवाळ्यात सर्दी-खोकला त्रास देत असेल तर आले आणि गूळ वापरा.
आले आणि गुळामुळे सर्दी, खोकला आणि घशातील कफ यापासून आराम मिळतो.
आले वापरण्यासाठी गॅसवर गरम करून बारीक करून घ्या. गूळ थोडा मऊ करून त्यात आले घालावे.
कोमट पाण्यासोबत सेवन केल्याने कफ निघून जातो.

 

 

3. मध आणि आल्याचे सेवन करा (Eat Honey And Ginger)
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले मध घसादुखीपासून आराम देते, तसेच कफपासून आराम देते.
आल्याचे मधासोबत सेवन केल्याने सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो. एका चमच्यात मध घेऊन त्यात आले मिसळा.
आता ही पेस्ट दिवसातून दोनदा प्या, कफ दूर होईल.

 

 

4. मिठाच्या पाण्याने गुळण्या करा (Rinse With Salt Water)
कफ आणि श्लेष्मापासून मुक्त होण्यासाठी मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने घशाला खूप आराम मिळतो.
यामुळे घशातील श्लेष्मा साफ होतो आणि कफ देखील दूर होतो.
तुम्ही एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ टाका आणि दिवसातून दोनदा गुळण्या करा.

 

 

Web Title :- Cough Cure | natural home remedies to get rid of a cough in winter know how to use it

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्यात बिर्याणीवरुन पुन्हा वाद, जाणून घ्या नेमका प्रकार

 

LPG Cylinder Subsidy | प्रत्येक महिन्याला बँक अकाऊंटमध्ये एलपीजी सबसीडी जमा होतेय? असं करा चेक, जाणून घ्या

 

Uddhav Thackeray | ‘प्रश्न विचारायला फार अक्कल लागत नाही’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे