Cough Syrup Alert | सावधान! सर्दी आणि अ‍ॅलर्जीचे ‘हे’ कफ सिरप घेऊ शकते तुमचा जीव, WHO ने जारी केला अलर्ट

नवी दिल्ली : भारतातील आणखी एका कफ सिरप (Cough Syrups) बनवणाऱ्या फार्मास्युटिकल कंपनी (Pharmaceutical Company) बाबत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने अलर्ट जारी केला आहे. डब्ल्यूएचओने भारतीय फार्मास्युटिकल कंपनी फोर्ट्स (इंडिया) लॅबरोटरीजच्या ‘कोल्ड आउट’ सिरप (Cold Out Syrup) च्या एका बॅचवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, हे आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे, यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारीच सांगितले की, दोन महिन्यांपूर्वी कफ सिरपच्या निर्यातीबाबतचे नियम बदलण्यात आले होते. आता कोणतीही कंपनी सरकारी लॅबमध्ये चाचणी केल्याशिवाय औषधे परदेशात पाठवू शकत नाही. (Cough Syrup Alert)

अलीकडेच, आफ्रिकन देश गाम्बियासह जगभरातील ३०० लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार ७ भारतीय कफ सिरप उत्पादक कंपन्यांवर बंदी घालण्यात आली होती. मुलांना कफ सिरपचा डोस वजनानुसार किंवा ५ मिली पर्यंत दिला जातो. त्याच वेळी, प्रौढ व्यक्तीला १० मिली आणि काही प्रकरणांमध्ये १५ मिली देखील डोस द्यावा लागतो. डोस डॉक्टर वाढवू किंवा कमी करू शकतात. (Cough Syrup Alert)

याच वर्षी फक्त गांबियामध्ये ६६ मुलांची किडनी निकामी झाल्याने मृत्यू झाला. या मृत्यूंसाठी भारतीय कफ सिरपला जबाबदार ठरवण्यात आले होते. तेव्हा केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले होते की, भारतात तयार होणाऱ्या औषधांच्या गुणवत्तेशी कधीही तडजोड केली जाणार नाही. बनावट औषधांमुळे कोणाचाही मृत्यू होऊ नये यासाठी भारत सरकार भविष्यात जास्त प्रभावी पावले उचलेल.

मृत्यू का होत आहेत?

अलीकडेच, डब्ल्यूएचओने अनेक औषधी कंपन्यांच्या कफ सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोलचे प्रमाण जास्त असल्याने बंदी घातली होती. या कंपन्यांच्या कंपाऊंडमुळे भारतातही काही मृत्यू झाले आहेत. परंतु, या कंपाऊंडवर भारतात अद्याप बंदी घालण्यात आली नव्हती. पण, गांबियाच्या घटनेनंतर कारवाई सुरू झाली आहे.

ज्या कंपाऊंडचा उल्लेख डब्ल्यूएचओने केला आहे, ती चव वाढवतात आणि गोड देखील आहेत. डॉक्टरांचे म्हणणे आहे की डब्ल्यूएचओने ज्या कंपाऊंडचा उल्लेख केला आहे ते कार्बन कंपाऊंड आहे. त्यात सुगंध नसतो आणि रंगही नसतो. हे गोड असते आणि मुलांच्या सिरपमध्ये यासाठी मिसळले जाते जेणेकरून त्यांनी ते सहज प्यावे. औषधामध्ये हे कंपाऊंड जास्तीत जास्त ०.१४ मिलीग्राम प्रति किलोपर्यंत औषधांमध्ये मिसळता येते. १ ग्रॅम प्रति किलोपेक्षा जास्त मिसळल्याने मृत्यू देखील होऊ शकतो.

कोल्ड आउट कफ सिरपमध्ये ‘हे’ आढळले

कफ सिरप ‘कोल्ड आऊट’च्या तपासणीत डायथिलीन ग्लायकॉल (Diethylene Glycol) चे प्रमाण २.१ टक्क्यांहून
जास्त असल्याचे आढळून आले. हे आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे आणि यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो.
कंपनी याबाबत डब्ल्यूएचओला गॅरंटी देऊ शकली नाही. या सिरपचे सॅम्पल इराकमध्ये घेण्यात आले होते.
ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. त्याची निर्मिती तामिळनाडू येथील फोर्ट्स लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेडने
महाराष्ट्रातील डाबीलाइफ फार्मा प्रायव्हेट लिमिटेडसाठी केली होती. हे सिरप सामान्य सर्दी आणि अ‍ॅलर्जीच्या
लक्षणांसाठी वापरले जाते.

एकूणच, भारतात बनवलेल्या कफ सिरपमुळे झालेल्या मृत्यूनंतर, देशात ९०० हून जास्त कफ सिरपची चाचणी घेण्यात
आली आणि कंपन्यांना विश्लेषणाचे प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार,
कोणत्याही प्रकारची चूक झाल्यास हे प्रकरण राज्य परवाना प्राधिकरणासमोर मांडले जाऊ शकते.
देशात मागील काही महिन्यांत १६२ औषध कंपन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये १४३ औषध
कंपन्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Bacchu Kadu | ‘…तर मंत्रालयातील सचिव कार्यालयात साप सोडू’, आमदार बच्चू कडूंचा थेट इशारा (व्हिडीओ)

Bhimashankar Temple | भीमाशंकर मंदिर परिसरात मोबाइल वापरास बंदी, मंदिर प्रशासनाचा निर्णय