दुर्देवी ! ‘कफ’ सिरपमध्ये चक्क विष, 9 लहान मुलांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : आपल्याला साधा सर्दी खोकला झाला तर आपण डॉक्टरचा सल्ला न घेता सर्वात आधी कफ सिरप (poison in Cough syrup) घेत असतो. मात्र या कप सिरपमध्ये असणाऱ्या विषारी पदार्थांमुळे तब्बल ९ लहान मुलांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. ही धक्कादायक घटना जम्मूमधील उधमपूर येथे घडली आहे. या कपसिरपचे नाव Coldbest-PC असे आहे. या दुर्घटनेमूळे देशातील सुमारे आठ राज्यांत कफ सिरपच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

हे कप सिरप हिमाचल प्रदेशातील Digital Vision ही औषध कंपनी बनवते, अशी माहिती जम्मू-काश्मीरच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक औषध नियंत्रक सुरिंदर मोहन यांनी दिली. तसेच चंदीगडच्या PGIMER अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उधमपूरच्या जिल्ह्यातील मुलांचा मृत्यू हा Coldbest-PC या कफ सिरपमधील Diethylene Glycol या विषारी पदार्थामुळे झाला आहे असे उघडकीस आले आहे.

जम्मूच्या डॉ. रेनू शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०१९ चा शेवटचा आठवडा ते १७ जानेवारी दरम्यान या ९ लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या सर्व मुलांना Acute renal failure च्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. दरम्यान या सर्व ९ मुलांचा मृत्यू Coldbest-PC या कफ सिरपमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे कप सिरप सिरमौर जिल्ह्यात तयार होत असून सध्या त्याच्यावर बंदी घालण्यात आले आहे. या कप सिरपच्या पुढील चाचणीसाठी जम्मूजवळील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ इंटीग्रेटीव मेडिसिन तसेच चंदीगडच्या औषध तपासणी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे. या सिरपमध्ये Diethylene Glycol नावाचा विषारी पदार्थ आढळला असून याबाबतचा अंतिम रिपोर्ट अजून तरी आलेला नाही.

You might also like