वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विद्यार्थ्यांना समुपदेशन

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यामध्ये दररोज कुठे ना कुठे अपघात होत असतात. शहरातील अरुंद रस्ते आणि अपघात झाला तर वाहतूक कोंडी. हे नित्याचे झाले आहे. हे अपघात बेशिस्त वाहन चलाकांच्या चुकीमुळे होतात. त्यामुळे बेशिस्त वाहन चालकांना वाहतूकीची शिस्त लागावी यासाठी पुणे वाहतूक शाखेकडून अनेक उपाय योजना केल्या जातात. वाहतूक पोलिसांनी वाडीया कॉलेज चौकात विशेषमोहीम राबविली. यामध्ये ४० विद्यार्थ्यावर कारवाई करुन त्यांचे समुपोदेशन केले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’39be9f35-cb0c-11e8-8e51-610018be9e74′]

पुणे वाहातूक शाखेचे पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली वाडीया कॉलेज चौकात  विशेष मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, विना परवाना वाहन चालविणे, विना हेल्मेट तसेच वाहतुकीचे नियमभंग करणाऱ्या ४० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश होता.

[amazon_link asins=’B06WD4JFDP,B07D1Q7KPN,B076DB939X’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’56711e6f-cb0c-11e8-9282-4f4ed578d18d’]

कारवाई करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना वाहतूकीचे नियम समजावेत. तसेच त्यांच्या पाल्यांनाही वाहतूकीचे नियम समजावेत यासाठी वाहतूक शाखेने कारवाई करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून घेतले होते. विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना पोलीस उपायुक्त कार्यालयातील संस्कारभवन येथे समुपदेशन करण्यात आले. यावेळी मुलांना आणि पालकांना व्हिडीओ क्लिप्स दाखवून विद्यार्थ्यांना पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी समुपदेशन केले.

अॅमेझॉन’ देणार ५० हजार रोजगार

शहरातील अपघात कमी करण्यासाठी वाहतूक शाखेकडून अनेक उपाय योजना आखल्या जात आहेत. या महिमेद्वारे अनेक वाहन चालकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. शहरातील वाहतूक सुरळीत चालावी. अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी पुणे वाहतूक शाखेकडून वाहन चालकांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येते. आज राबवण्यात आलेली विशेष मोहीम या पुढेही चालू राहणार असून बाशिस्त वाहन चलकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन न करता त्याचे तंतोतंत पालन करुन वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.