धुळ्यातील बनावट देशी-विदेशी मद्यसाठा जप्त

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत मोठ्या प्रमाणात बनावट मद्यसाठा जप्त केला आहे. तब्बल २ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असून एक जण फरार आहे.

याबाबत सविस्तर माहिती, शिरपुर तालुक्यातील नवापाडा (रोहिणी-भोईटी) येथील घरात मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी बनावट मद्यसाठा करण्यात येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाकातील अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानूसार सापळा रचण्यात आला. मद्यसाठा करण्यात आलेल्या घरावर छापा टाकून विदेशी मद्य, बियर, स्पिरीट असा एकून २ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एक जणाला ताब्यात घेण्यात आले असून एकजण फरार झाला आहे.

ही कारवाई भरारी पथक निरीक्षक आय.एन. वाघ (धुळे), नि.व्ही.एम.माळी (चाळीसगाव), सा.दु.नि ब्रम्हाने, संजय कुटे, के.एम. गोसावी, शांतीलाल देवरे, नितीन पाटील, गिरीश पाटील, विजय परदेशी, अमोल पाटील, राहूल सोनवणे, रवींद्र जंजाळे, नंतून ननावरे, वाहन चालक व्ही.बी.नाहीदे, मुकेश पाटील, रघु सोनवणे, सागर देशमुख यांनी केली. पुढील तपास आय.एन.वाघ करीत आहे.