अहमदनगर : उड्डाणपुलातील बाधित इमारतीचे मुल्यांकनासाठी मोजणी सुरू, महिन्याभरात प्रत्यक्ष कामास सुरुवात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – बहुचर्चित उड्डाणपुलाचे काम आता युद्ध पातळीवर सुरु झाले आहे. आज बांधकाम विभाग, नॅशनल हायवे ॲथॉरिटी व महापालिकेच्यावतीने उड्डाणपूल मार्गावर ज्या इमारती बाधित होणार आहे. त्यांचे मूल्यांकन करण्यासाठ या तीनही विभागातर्फे मोजणी करण्यास सुरुवात केली आहे. येत्या एक महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहितीही नॅशनल हायवे विभागाकडून देण्यात आली आहे.

या उड्डाणपुलाच्या बांधकामावेळी ज्या इमारती अडथळा निर्माण करतील ते काढण्याचे काम महापालिकेकडून लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे आता नगरकरांच्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या उड्डाणपुलाबाबत लवकरच कामास सुरवात होणार आहे. अनेक वर्षांचे नगरकरांचा स्वप्न पूर्ण होईल, असे वाटू लागले आहे. बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सागर खोतकर, महानगरपालिकेचे भूमापक के. एफ. पठाण आणि नॅशनल हायवे विभागाचे मूजिफ सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोजणी सुरू आहे.

उड्डाणपूल बाधित होणाऱ्या इमारतींचे मूल्यांकन करून त्याचा मोबदला मालमत्ताधारकांना देण्यात येणार आहे. त्यामुळे बाधित इमारतींचे मूल्यांकनाचे काम सुरू करण्यात आले आहे महिन्याभरात उड्डाणपुलाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू होईल, असे सांगितले जाऊ लागले आहे. त्यामुळे स्टेशन रस्त्यावरील अनेक वर्षांपासून प्रलंबित वाहतूक कोंडीचा प्रश्न निकालात निघेल, अशी आशा आहे.

आरोग्यविषयक वृत्त –