सांगलीच्या तिरंगी लढतीत भाजपचे संजयकाका पाटील २७,००० पेक्षा अधिक मतांनी आघाडीवर

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – सांगली लोकसभा मतदार संघात यंदाच्या निवडणुकीत तिरंगी लढत रंगली आहे. सांगलीत भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील तसेच वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांच्यात चुरस आहे. खरी लढत ही खासदार संजयकाका पाटील आणि विशाल पाटील यांच्यातच होती मात्र गोपीचंद पडळकर हे दिखील रेस मध्ये आहेत. सध्या हातीच आलेल्या आकडेवारीनुसार संजयकाका पाटील हे २७,०००पेक्षा अधिक मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना विशाल पाटील टफ फाईट देत आहेत. गोपीचंद पडळकर हे तिसऱ्या स्थानावर आहेत. सांगली लोकसभा मतदार संघात एकूण १८ लाख ०३ हजार ०५४ मतदार आहेत. त्यापैकी ११,७९,३४४ मतदारांनी मतदान केले.

सांगली मतदार संघ म्हणजे काँग्रेसचा हक्काचा बालेकिल्ला मनाला जात होता मात्र २०१४ साली भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी रेकॉर्ड ब्रेक करीत सांगलीत भाजपचा झेंडा फडकावला. २०१४ च्या मोदी लाटेत सांगलीचा गड काँग्रेसच्या हातून निसटला. २०१९ ची लोकसभा निवडणूक पाहता पश्चिम महाराष्ट्रात महत्वाच्या समाजलया जाणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २०१४ च्या निवडणुकीनंतर मात्र भाजपशी सोडचिठ्ठी घेतली. यंदाच्या निवडणुकीत स्वतः चा स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्ष घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरला. या निवडणुकीत पुन्हा एकदा या मतदारसंघावर ताबा मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता आणि त्यासाठी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मदत घेतली. सांगली लोकसभा मतदारसंघात मिरज, सांगली, जत, खानापूर, पलूस कडेगाव, तासगाव कवठे महांकाळ या विधानसभा मतदारसंघ येतात.

वंचित बहुजन आघाडीची मतं निर्णायक
सांगलीमध्ये बसपा आणि वंचित बहुजन आघाडीचेही उमेदवार होते. वंचित बहुजन आघाडीतर्फे गोपीचंद पडळकर रिंगणात होते . सांगलीमधला खरा मुकाबला काँग्रेस आणि भाजपमध्येच आहे. तरीही वंचित आघाडीची निर्णायक मते कुणाला फायदा करून देतात यावरच भाजप आणि काँग्रेसचं इथलं यश अवलंबून होते. त्यानुसार ११:३० वाजेपर्यंत भाजपला ८२३१८ ,स्वाभिमानीला ५४५२० तर नव्या वंचित बहुजन आघाडीला ४८५७५ मते मिळाली आहेत .